shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात सबके साथ.. विश्वासघात आंदोलन..!!

इंदापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात सबके साथ.. विश्वासघात आंदोलन..!!



इंदापूर प्रतिनिधी:
   शंभरी कडे चाललेला पेट्रोल व डिझेल तसेच हजारी कडे चाललेला घरगुती सिलेंडर च्या किमतीच्या विरोधात आज इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वा मध्ये आंदोलन करण्यात आले . या वेळी पेट्रोल पंपावर लॉलीपॉप वाटप करण्यात आला . काँग्रेस चे आज भाजपा सरकारच्या विरोधात साबके साथ विश्वासघात आंदोलन करण्यात आले
     या वेळी  तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत बोलताना भाजप सरकार वर सडकून टीका करत . म्हणाले की,भाजपचे सरकार हे व्यापारी सरकार आहे , कॉरोनाच्या अत्यंत बिकट काळात देखील  सरकार अत्यावश्यक असणाऱ्या पेट्रोल डीजेल व घरगुती गॅस याकडे नफेखोरच्या नजरेतून बघते हे दुर्दैवी आहे . सरकारने लावलेला भरमसाट कर कमी केला पाहिजे अन्यथा येणाऱ्या दिवसात महागाई नवा उच्चांक करेल व ह्यात सर्वसामान्य जनता भरडून निघेल . भाजपने सर्वसामान्यांचा विश्वासघात केला आहे
      या वेळी काँग्रेस अध्यक्ष सहित पुणे जिल्हा सरचिटणीस जकिर काजी , तालुका कार्याध्यक्ष काका देवकर , इंदापूर शहर अध्यक्ष रमजान ( चमन ) भाई बागवान , निवास शेळके, राहुल वीर, महादेव लोंढे , शहर उपाध्यक्ष तुषार चिंचकर , रवींद्र फाळके , जिल्हा युवक सरचिटणीस श्रीनिवास पाटील , मिलिंद साबळे , सुफियांखान जमादार , समीर शेख , आदी  उपस्तिथ होते.
close