प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:-
जनविकास परिवर्तन आघाडीच्यावतीने आदर्श पत्रकार संघातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार हारूनभाई इनामदार यांनी केला.
या बाबतची माहिती अशी की आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे आणि सचिव गौतम बचुटे व कार्याध्यक्ष म्हणून सौ. रत्नमाला ताई मुंडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवड झालेल्या आहेत. त्या प्रित्यर्थ जनविकास परिवर्तन आघाडीचे सर्वेसर्वा हारूणभाई इनामदार कृषी उत्पन्न समितीचे दत्तात्रय लाड यांनी पत्रकारांचा सत्कार केला.
या वेळी आदर्श पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक सोनवणे, सचिव गौतम बचुटे, रत्नमालाताई मुंडे, धनंजय कुलकर्णी, माजी अध्यक्ष विजय आरकडे, सहसचिव प्रकाश मुंडे, धनंजय घोळवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच या प्रसंगी झुंजार पत्रकार संघाचे सचिव दत्तात्रय हंडीबाग, शेख सादेक, हाजी साहेब इनामदार आणि कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.

