shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान आवास घरकुल योजनासाठी पात्र झालेल्या नागरिकांकडून तात्पुरते रहिवासी दाखले स्वीकारा-पिंपरी युवासेना

पिंपरी चिंचवड:-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून पंतप्रधान आवास घरकुल योजनेची सोडत झालेली आहे. या योजनेत पात्र झालेल्या नागरिकांना रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, भाडे करार  बंधनकारक आहे.

 रहिवासी दाखला काढण्यासाठी नागरिकांना पंधरा वर्षाचा पुरावा लागत आहे. परंतु पंधरा वर्षाचा पुरावा नसल्यामुळे पात्र नागरिकांना रहिवासी दाखला मिळत नाही. तरी आपण पात्र नागरिकांकडून तात्पुरता रहिवासी दाखला घ्यावा  असे निवेदन पिंपरी युवा सेनेकडून मा. अशोक भालकर (सह. शहर अभियंता ) स्मार्ट सिटी यांना देण्यात आले. ह्यावेळी पिंपरी युवासेनेचे विभागसंघटक श्री. निलेश हाके, मोसीन शेख, अविनाश जाधव उपस्थित होते.
close