पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलीला चॉकलेट व पैसे देण्याचे आमिष दाखवून एका ६८ वर्षांच्या नराधमाने लेंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टीत २९ मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे.याप्रकरणी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
सावन गंगाराम डोळस (वय-६८ वर्षे, रा. फुलेनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डोळस याने फिर्यादी यांच्या १० वर्षांच्या मुलीला चॉकलेट व पैसे देण्याचे आमीष दाखविले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला बालाजीनगर झोपडपट्टीतील ओम चेम्बर्सच्या पाठीमागे असलेल्या झाडामध्ये नेऊन तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती पीडितेने आईला सांगितल्यानंतर आरोपीविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक एस. एस. पांचाळ करीत आहेत.

