पिंपरी चिंचवड :-सेवेन्थ डे ॲडव्हेन्टीस्ट तमिल चर्च पिंपळे गुरव यांच्यामार्फत ग्लोबल युथ डे उत्साहात व अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला तारा सोफोष धडफळे सेंटर पिंपळे गुरव या ठिकाणी तेथील अनाथ लहान मुलांना जीवन आत्मक वस्तू व धान्य कपडे फळ इत्यादी वस्तू सांगवी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर साहेब यांच्या हस्ते तेथील अधिकारी वर्गांना या वस्तू सुपुर्त करण्यात आल्या.
हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध सोशल डिस्टन्स पाळत करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जस्सू राज आय्य दुराई तर आभार प्रदर्शन कमला स्वामी यांनी केले . तर कार्यक्रमाचे आयोजन जॉन अब्राहम, कॅथरीन जसुराज , जॉईस अब्राहम , ग्लॅडीस अब्राहम , निकिता पिल्लाई , चेल्लीमा अब्राहम यांनी केले होते .

