सध्याच्या काळात कोरोना संदर्भात
नागरिकांनी स्वतः बरोबर इतरांचीही काळजी घ्यावी : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे..!!
इंदापूर प्रतिनिधी : पुढील पंधरवडा हा कोरोना विषाणूचा वाढीसाठी अनुकूल ठरणार असून या कालावधीत नागरिकांनी स्वतः बरोबर इतरांचीही काळजी घ्यावी असे आवाहन राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
आज (दि. १३) रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या दुसर्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस प्रातांधिकारी कांबळे, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.एकनाथ चंदनशिवे, इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे तसेच सर्व खात्यांचे विभागप्रमुख उपस्थित होते. .
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यात कोरोना वाढीच्या संख्येत इंदापूर ग्रामीणचा दुसरा नंबर लागतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्क वापरणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होताना काळजी घेतली जावी असे सांगितले. कोरोना रुग्ण आढळून आल्यास तातडीने त्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना वेगळे करावे. लसीकरणाची संख्या वाढवावी असे सांगितले.
कोणतेही आठवडे बाजार हे बंद होणार नाहीत. पण नागरिकांनी गर्दी न करता आपले व्यवहार पार पाडावेत असे आवाहन केले.
प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी शहराबरोबरच, इंदापूर तालुक्यातील सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना यावेळी उपस्थित अधिकार्यांना दिल्या.

