भोसरी, दि. ३० मार्च : एका १० वर्षांच्या मुलीवर एका ६८ वर्षांच्या वृद्धाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टीत दि. २९ मार्चला सायंकाळी ५.०० वा.च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली असून पोलिसांनी वृद्धाला अटक केली आहे.
सावन गंगाराम डोळस (वय-६८ वर्षे, रा. फुलेनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डोळस याने फिर्यादी यांच्या १० वर्षांच्या मुलीला चॉकलेट व पैसे देण्याचे आमीष दाखविले. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला बालाजीनगर झोपडपट्टीतील ओम चेम्बर्सच्या पाठीमागे असलेल्या झाडामध्ये नेऊन तिच्या अंगावरील कपडे काढून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती पीडितेने आईला सांगितल्यानंतर आरोपीविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक एस. एस. पांचाळ करीत आहेत

