shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताच फिर्यादीच्या घरासमोर फटाके वाजवून केली मारहाण..!!

पुन्हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल : आरोपीस अटक

केज / जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :- केज तालुक्यातील जानेगाव येथे ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करताच आरोपीने फिर्यादीच्या घरा समोर फटाके वाजवले. या बाबत विचारणा करताच मारहाण केल्या प्रकरणी पुन्हा जमीन मंजूर झालेल्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी तात्काळ आरोपीस ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे.



या प्रकरणी माहिती अशी की, दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी जानेगाव ता. केज येथे फुलचंद हरिभाऊ शिंदे याने येथील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील महिला सरपंच सौ. आम्रपाली ओव्हाळ यांच्या घरा समोर फटाके वाजविले. यामुळे त्यांची लहान मुले घाबरून गेली या विषयी सरपंच सौ. आम्रपाली यांचे पती विलास ओव्हाळ यांनी पोलीसात तक्रार देण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यातील झोपडपट्टीच्या पुलाजवळ फुलचंद दिसला म्हणून विलास ओव्हाळ यांनी त्याला त्यांच्या घरा समोर फटाके का वाजविले? असे विचारताच फुलचंद शिंदे याने विलास ओव्हाळ यांना मारहाण व शिवीगाळ केली. तसेच तू पूर्वी वाचलास आता तुला सोडणार नाही असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी विलास ओव्हाळ यांच्या तक्रारी नुसार युसुफवडगाव पोलीस स्टेशनला फुलचंद हरिभाऊ शिंदे यांच्या विरुद्ध दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा ३(१) आर व भा द वि ३२३ आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल होताच पोलीसांनी आरोपी फुलचंद शिंदे यास ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत हे पुढील तपास करीत आहेत.


घटनेची पार्श्वभूमी :- दि. २ ऑक्टोबर २०२० रोजी सरपंच सौ. आम्रपाली ओव्हाळ यांचे पती विलास ओव्हाळ यांना फुलचंद शिंदे व त्याचे साथीदार अशोक शिंदे आणि अशोक उर्फ भैय्या शिंदे यांनी जातीवाचक शिविगाळ करून रस्त्यात अडवून चाकु हल्ला करून जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी केले होते. त्या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला महादेव शिंदे, अशोक फुलचंद शिंदे व अशोक उर्फ भैय्या हरिभाऊ शिंदे सर्व रा.क कल कल जानेगाव ता. केज यांच्या विरुद्ध दि. ३ ऑक्टोबर रोजी गु.र.नं. २००/२०२० भा.दं.वि. ३२४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा ३(१) (आर) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच 

गुन्ह्यात अशोक शिंदे, अशोक उर्फ भैय्या शिंदे यांना अटक पूर्व जामीन मंजूर मिळाला होता आणि त्या नंतर दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फुलचंद शिंदे यास अटक पूर्व जमीन मंजूर करताच त्याने पुन्हा सरपंच पती विलास ओव्हाळ याच्या विरुद्ध आगळीक केली.


आरोपीस अटक न करणे आणि खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल झाला नसल्याने आरोपीचे मनोधैर्य वाढले असावे :-  दि. २ ऑक्टोबर २०२० रोजी विलास ओव्हाळ हे चाकू हल्ल्यात जखमी झाले होते. तरी पोलीसांनी या तीनआरोपी विरुद्ध खुन करण्याच्या इराद्याने हल्ला करणे यासारखे गुन्हे दाखल केले नव्हते. आरोपीस अटक न करता त्यांना फरार होण्यास वेळ मिळाला आणि त्यांनी पुन्हा अशी आगळीक केल्याची चर्चा सुरू आहे.

close