shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी-चिंचवड मध्ये गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा..!


पिंपरी-चिंचवड:-गांजा विक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 75 हजारांचा चार किलो 913 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) दुपारी भाटनगर, पिंपरी येथे करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक सुब्राव भीमराव गवारे यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एनडीपीएस कायद्यान्वये दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या पथकाला माहिती मिळाली की, भाटनगर येथे एका इमारतीमध्ये गांजा विक्री केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन महिलांवर कारवाई करून त्यांच्याकडून 75 हजार 350 रुपयांचा चार किलो 913 ग्रॅम गांजा जप्त केला. या महिला रेखा पोपटसिंग तामचीकर हिच्या सांगण्यावरून गांजा विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
close