shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री क्षेत्र पावनधाम येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सव संपन्न..!!

शासकीय नियमानुसार बीजोत्सव संपन्न; दरवर्षी लाखोंच्या साक्षीने होणार्या  बीजोत्सवस यावर्षी  फक्त पन्नास भाविकांचीच उपस्थिती..!! 
  

प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:- 
तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे पावनधाम संस्थानचे  संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य  वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष  ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्री यांच्या मार्गदर्शनाखाली येथे दि.30 मार्च वार मंगळवार रोजी शासकीय नियमांचे पालन करत सोशल डिस्टंस ठेवत केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज बीजोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला.
संत तुकाराम महाराज बीजोत्सवा निमित्त संस्थानच्या वतीने  मंदिरातील गाभारा फुलांनी सजवला होता.त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांच्या मुर्तीस दुग्ध अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली. 


कोरोणाच्या पादुर्भावामुळे लाखोंच्या संख्येने येणार्या  भावीकांना  यावर्षी श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथील संत तुकाराम महाराजांच्या  मंदिरात येता आले नाही,परंतू सोशल मिडीयाच्या माध्यमातून पावनधाम येथील संत तुकाराम महाराजांच्या मुर्तीच्या  दर्शनाचा लाभ मात्र घरबसल्या घेता आला.दरवर्षीच्या प्रथेनूसार गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्री यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले.सुभद्रा इंडस्ट्रीजचे मालक नामदेव गोरे यांच्या वतीने तयार केलला प्रसाद स्वयंसेवकांच्या हस्ते सोशल डिस्टंन्सीचे भान ठेवून  भाविकांना घरपोच करण्यात आला. बीजोत्सवा निमित्त दिवसभर ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्री यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानच्या वतीने अमोल महाराज, जनार्धन महाराज चलवाड,अशोक महाराज,हनुमंत महाराज शिरसट,पारेकर बप्पा यांनी परिश्रम घेतले.
close