देहरे । प्रतिनिधी : नगर - शिर्डी-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर तालुक्यातील देहरे बसस्थानकावर आज सकाळी सुमारे ९ वाजे दरम्यान राजस्थान पासिंग RJ 14 GH-4279 असलेल्या कंटेनर ने नांदगाव येथील योगेश नखर्या चव्हाण हा मजूरी कामासाठी रस्ता ओलांडून जात असताना वरील कंटेनर ने जोराची धडक दिली.
त्यावेळी योगेश चव्हाण पुढच्या चाकाखाली सापडुन त्याच्या उजव्या पायाचा चुराडा झाला आहे. अपघात झाल्यानंतर त्याचा उजवा पायावर गाडीचे चाक थांबल्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला. तो पर्यंत खुप मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
यावेळी पोलीस पाटील चंद्रकांत खजिनदार, संजय लांडगे, सरपंच बबन करंडे, पंचायत समिती सदस्य व्हि.डी काळे. विठ्ठल पटारे, सनी लांडगे, महेश काळे, मेघनाथ धनवटे, यशवंत काळे. व गावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने रूग्णवाहिका बोलावून सदर इसमास इस्पितळात दाखल करण्यासाठी सहकार्य केले. अपघात झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.
सदर अपघातामुळे दोन्ही बाजूंनी रस्त्यावर गाड्या थांबल्या मुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर सदर कंटेनर तेथून हलवून बाजूला लावण्यात आले.तेवहा वाहतूक कोंडी कमी झाली.

