shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनईत कोविड लसीकरणला सुरवात.आज भाजीमंडईत 41 जणांची ॲन्टिजेन टेस्ट. ..!!


प्रतिनिधी । मोहन शेगर:
सोनई :सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आज कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरवात झाली.मागच्या आठवडयात लसीची कमतरता आली होती.आज पुन्हा कोविड लसीचा कोटा मिळाल्यानंतर लसीकरणाला सुरवात झाली.      

तसेच महादेव मंदिर जवळील जि.प शाळेत कोविड अॅन्टिजेन टेस्टला सुरवात झाली आहे.आज  मारूती मंदिरा समोर भाजीपाला विकणारे 41 व्यापारी यांच्या पण ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आल्या.यात कुणीही पाॅझिटिव रूग्ण सापडला नाही.शनिवार,रविवार लाॅकडाऊन नंतर भाजीपाला बाजारात गर्दी झाली होती.यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणुण भाजीमंडई मधील व्यापारी वर्गाची कोरोना टेस्ट करण्यात आल्या.

यावेळी सोनईचे सरपंच धनजंय वाघ,आरोग्यधिकारी डाॅ.राजेंद्र कसबे,डाॅ.संध्या देशमुख,डाॅ.सुनिल वाघ,डाॅ.चंद्रकला गागरे,डाॅ.पुनम भुसारी,डाॅ.प्रज्ञा आव्हाड,डाॅ.स्मिता चेके,आरोग्य सहायक रमेश जावळे,एन.व्ही विरकर,आरोग्य सेवक राजेंद्र पाटोळे,जे.पी दिवटे,अर्जुन गुशिंगे,आरोग्यसेविका एस.एस सगळगिळे,परिचर वैशाली अकोलकर,केरू दरंदले,अमोल लोहकरे,रणजित सारवान,रोहिणी कुलट,मंगल दराडे या आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी लसीकरण व अॅन्टिजेन टेस्ट मध्ये सहभाग घेतला.
close