श्रीरामपूर : - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) म्हणजेच जागतिक संविधान व संसदीय संघाच्या महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरच्या सन २०२१-२२ साठीच्या कार्यकारणीची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली.
डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र (श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत श्री. भाऊराव माळी ( सचिव ), प्रा.डॉ. शैलेंद्र भणगे ( कोषाध्यक्ष ), श्री.बाबासाहेब वाकचौरे ( सहसचिव ), श्री. राजेंद्र देसाई ( प्रसिद्धी प्रमुख ) यांची पदाधिकारी म्हणून तर प्रा.डॉ. राज परब ( ठाणे ), प्रा. अरूण सावंग
( बुलढाणा ), श्रीमती मंदा पडवेकर ( चंद्रपूर ) प्रा.लेविन भोसले, प्रा.डॉ. दादाराव म्हस्के व ऋषिकेश विघावे यांची कार्यकारीणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
त्याच बरोबर सल्लागार समितीच्या तीन सदस्यांची नावेही घोषीत करण्यात आले असून कु.विद्या जाधव ( नाशिक ) या कायदेशीर सल्लागार असतील तर डॉ. विशाखा भळगट ( अहमदनगर ) या आरोग्य सल्लागार असणार असून प्रा. नवनाथ अकोलकर शैक्षणिक व सामाजिक सल्लागार असतील. येत्या १ एप्रिलपासून नवीन कमिटी कार्यभार स्विकारेल तर त्यांची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत असेल.

