shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुरवठा ..!



ऑक्सिजन संपलेला
शिल्लक नाही  खाटा
रेमडेसिवीर   तुटवडा
सरला लसीचा  साठा

रूग्णवाहिकाचं रूग्ण
अडून  पडल्या  वाटा
कागद झाल्या केवळ
कामाला येईना  नोटा

लस मधेचं आली तर
फक्त आप्तेष्टांत वाटा
बोर्ड लावा दारावरती
मंत्र्या  संत्र्यांना  भेटा

सामान्य जन असालं
तर चलाबाजूस फुटा
जनावरे अति  झाली
शिल्लक नाही  गोठा

सारे काही  ऑलवेल
श्रेय  आपणचं  लाटा
चुका कुठल्या घडता
दुस-या  दारात लोटा

- हेमंत मुसरीफ पुणे 
  9730306996.
 www.kavyakusum.com

________________________________________
close