shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोनईत एक दिवसीय जनता कर्फ्युला नागरिकांचा प्रतिसाद..!!

प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई- सध्या दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य रोग वाढतच असल्याने या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून काल ( दि.४ रोजी,) रविवारी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी सोनई गाव एक दिवस कडकडीत बंद ठेऊन जनता कर्फ्यु यशस्वी केला.काल भरणारा आठवडे बाजारात व शहरात शुकशुकाट पाहायला मिळाला. दरम्यान त्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन  ग्रामपंचायतचे सरपंच धनंजय वाघ यांनी केले होते.

जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व  आरोग्यविभाग,सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी,ग्रामस्थ यांना सूचनांचे मार्गदर्शन करण्यात आले. गावात दिवसभर शांतता होती.

नेवासा तालुक्यातील कोरोनाची संख्या वाढत आहे, परिणामी सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे, म्हणून वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे हा रोग बाजाराच्या दिवशी फैलाव रोखण्यासाठी या दिवशी आठवडे बाजार सह गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले होते.

अशा या कोरोनाच्या संकट उभे असताना प्रशासनाच्या आदेश झुगारून काही  दुकाने छुप्या मार्गाने चालू असतात,त्यात देशी विदेशी अवैध दारू ,गांजा,गुटखा, मावा,विक्री मोटार सायकल वरून  करतात यांच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
close