shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वनराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच वनविभागाच्या कारवाईला त्रासून महिलेच्या विषप्राशनाची घटना निषेधार्ह - हर्षवर्धन पाटील

वनराज्यमंत्र्यांच्या तालुक्यातच वनविभागाच्या कारवाईला त्रासून महिलेच्या विषप्राशनाची घटना निषेधार्ह - हर्षवर्धन पाटील
इंदापूर :प्रतिनिधी दि. ८ एप्रिल २१
         वनविभागाने आजोती येथील सुमन ज्ञानदेव गुटाळ यांचे उभे ऊस क्षेत्र उद्ध्वस्त केल्याने त्यांनी या त्रासाला कंटाळून विष प्राशन केले.  त्यांच्यावर इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू असून राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी वैद्यकीय उपचारासंदर्भात पाटील यांनी माहिती घेतली.
            यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले ,' आज गुरुवारी आजोती येथील सुमन ज्ञानदेव गुटाळ यांना वनविभागाने कोणतीही नोटीस दिली नाही. तसेच त्यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अशा कोरोना महामारीच्या संकटात वनविभागाने आपली संपूर्ण यंत्रणा घेऊन या गरीब महिलेचा संसार उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. शेवटी या महिलेने या वनविभागाच्या कारवाईला त्रासून विष प्राशन केले. अशावेळी तेथील वनविभागाच्या कोणत्याही यंत्रणेने त्यांना मदत केली नाही,  शेवटी त्यांना मोटारसायकलवर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी वेळेत उपचार करून त्यांचा जीव वाचवला त्याबद्दल मी डॉक्टरांचे मनापासून आभार मानतो.
       वास्तविक पाहता या वन विभागाचे राज्यमंत्री या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते वन खात्याचे मंत्री असतानादेखील अधिकारी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता  कारवाई करतात. तसेच गेल्या सहा महिन्यांपूर्वी देखील ११ गावात जेसीबीने घरे पाडली, पोल्ट्री उध्वस्त केल्या. आज या महिलेवर अन्याय होत असेल तर ही बाब निषेधार्थ आहे. कोर्टामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता अशाप्रकारची हुकूमशाही करणे गोरगरिबांच्या विरोधात काम करणे याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही सर्वजण त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठाम आहोत.  उपचारासंदर्भात आम्ही डॉक्टरांशी चर्चा केली आहे. आजची घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून निषेधार्ह अशी आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले. 
_____________________________
close