shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलिसांच्या वतीने सोनईत रूट मार्च ...!


प्रतिनिधी । मोहन शेगर :-
सोनई : कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोनई पोलिसांनी शहरातील प्रमुख भागातून दि २७ रोजी बुधवारी सकाळी पोलीस  प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. 

यावेळी पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, ज्ञानेश्वर थोरात व  पोलीस कर्मचारी  या रूट मार्च मध्ये सहभागी झाले होते.

सोनई शहरातील प्रमुख भागामध्ये हा रूट मार्च काढण्यात आला. यावेळी प्रशासकीय सूचनांचे तंतोतंत पालन नागरिकांनी करावे, नियम मोडल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल आपली व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी.  तसेंच कायदा सुव्यवस्था बाधित ठेवावी अश्या सूचना या वेळी रामचंद्र कर्पे यांनी  नागरिकांना  दिल्या.
close