shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथील मुख्याध्यापक विष्णु घोडके यांचे "कुटुंब रंगलय वैद्यकीय क्षेत्रात"..!!



डॉ. अमोल घोडके यांना  आयुर्वेदिक क्षेत्रातील एम.डी.पदवी प्राप्त..!! 
 
प्रकाश मुंडे ।  केज जिल्हा प्रतिनिधी :- 
केज तालुक्यातील सर्वसामान्य कुंटूबातील हुशार विद्यार्थी आता दिवसेंदिवस ऊंच शिखर पार करत असल्याचे आता पहावयास मिळत आहे. यातच डॉ. अमोल घोडके यांनी आपल्या कुटुंबाच्या सहकार्याने व आपल्या बुद्धीमत्तेच्या साह्याने आरोग्य विभागाच्या आयुर्वेदिक क्षेत्रातील एम.डी पदवी संपादन केल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.
  

डॉ. अमोल घोडके यांचे वडील  श्री.विष्णू मुरलीधर घोडके हे केज तालुक्यातील चिंचोलीमाळी केंद्रातंर्गत येणाऱ्या डोका येथील जि.प.प्राथमिक शाळेत मुख्याद्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देवुन एकीकडे देशाचे आरोग्य  घडवण्याचे तर दुसरीकडे शैक्षणिक क्षेञात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन नव्या सशक्त पिढ्या घडविण्याचे काम करत आहेत.  मुख्याद्यापक श्री.विष्णू घोडके  व सौ.मंजुषा विष्णु घोडके यांनी आपले चिरंजीव अमोल घोडके यांना सर्वोत्तम संस्कार देवुन  शिक्षण दिले.  डॉ.अमोल यांचे प्राथमिक शिक्षण केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदीर येथे झाले.तर आरोग्य विभागातील शिक्षण  बी.ए.एम.एस.धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय उदगिर येथे पुर्ण झाले. तर त्यातील उच्च पदवी एम.डी.मेडीसीन हे पदवी शिक्षण आण्णासाहेब डांगे आयुर्वेदिक महाविद्यालय आष्टा ता.वळवा जि.सांगली या ठिकाणी पार पडले. 

यात डॉ. अमोल विष्णू घोडके यांनी अथक परिश्रम घेवुन आपल्या बुद्धी चातुर्याने व आपल्या कुटूंबाच्या सहकार्याने यश संपादन करत आरोग्य विमागातील आयुर्वेदिक क्षेत्रातील एम.डी.मेडीसीन हि पदवी प्राप्त केली. या बाबतचा निकाल दि.२४ मार्च २०२१ रोजी लागला असुन त्यात त्यांनी वरील एम.डी.मेडीसीन ही पदवी मिळवली. या बरोबरच डॉ.अमोल यांच्या पत्नी डॉ.रुतुजा घोडके या बी.ए.एम.एस.असुन,घोडके सरांचा दुसरा मुलगा डी.फॉर्म आहे तर मुलगी अश्विनी घोडके बी.एस्सी.मायक्रो बायलॉजीच्या पदवीधर असुन त्या ही डी.एम.एल.टी.आहेत. 

ह्या कुटुंबाची दुसरी पिढीच वैद्यकीय क्षेञात काम करत असल्यामुळे हे सर्वच कोरोनाच्या लढ्यातही अग्रेसर असुन रुग्णांची सेवा ही मनोभावे करत आहेत. त्यांचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत असुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
close