प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:-
भारतीय नागरिक शास्ञात लोकशाहीत चार महत्वाचे स्तंभ मानले जातात. लोकसभा-विधीमंडळ,दुसरा न्यायपालिका,तिसरा प्रशासन तर चौथा वृत्तपत्र. या चार ही स्तंभापैकी चौथा स्तंभ वृत्तपत्र माध्यम वा मिडिया सध्याच्या कोव्हीड -19 च्या कोरोनाच्या जागतिक महामारीची झळ वृत्तपञाच्या पञकारांनाही बसली.
गेल्यावर्षापासुन अनेक पञकार त्यांच्या जनसंपर्क व्यवसायामुळे कोरोनाग्रस्त झाले.राज्यात अनेक पत्रकार आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे औषधोपचार न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडले.
अशाच पद्धतीने परभणी येथेआर्थिक परिस्थितीमुळे दि.17/4/2021 या दिवशी "दिलासा"या पत्राचे पञकार अरुण हिस्वणकर यांनी सकाळी नऊ वाजता आपल्या रहात्या घरी गळफास घेवुन आपली जीवन याञा संपवली आहे. आर्थिक विंवचनेतुन त्यांनी हा निर्णय घेतला.
राज्य शासनानेही या चौथ्या स्तंभाला म्हणजेच वृत्तपत्रकारांनाही आर्थिक पाठबळ देण्याची गरज आहे. पत्रकारानांही ही मुले बाळे आहेत,त्यांच्यावर ही त्यांचे कौटुंबिक सदस्य अवलंबुन असतात ही भावना ठेवुन आर्थिक मदत झाल्यास या आत्महत्या थांबतील अशी आशा ठेवायला हरकत नाही.

