नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
अहमदनगर जिल्हा मध्ये लसिकरण मोहिमेत अनेक ठिकाणी वेग वेगळे प्रकार घडत आहेत. तर काही ठिकाणी लसिकरणात वशिले बाजी केल्याचा आरोप काही नागरिक करत आहे.तर काही नागरिकांनी लोकप्रतिनिध आजी माजी पदाधिकारीचे व आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या मधील काँल डिटेल्स तपासा असा हि आरोप केला आहे.
लसीकरण डोस अपुरे येत असल्याने अनेक अडचणी येत आहे.त्यात आज टाकळी काझी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी चालू असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान गोंधळ उडाला होता.त्यानंतर या ठिकाणी नगर पंचायत समितीचे मा.सभापती प्रविण कोकाटे यांनी तात्काळ भेट देत या ठिकाणी जो गोंधळ निर्माण झाला होता. तो दूर केला व लसीकरण मोहीम सुरळीत चालू केली.
यामुळे लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला. त्यानंतर मेडिकल ऑफिसर डॉ.प्रियंका शेंदुरकर व इतर स्टाफ यांना पुढील लसीकरणाच्या वेळी योग्य नियोजन करण्याच्या सूचना केल्या पुन्हा असा प्रकार घडता कामा नये. अशी सक्त ताकीद माजी सभापती प्रविण कोकाटे यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना समज दिली आहे.

