shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भगवान महावीर जयंती जैन बांधवांकडून अनोख्या पद्धतीने साजरी..!


महामारीच्या काळात गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हा उद्देश ठेवुन साजरी झाली महावीर जयंती...!


नगर शहर । प्रतिनिधी ( संजय वायकर):-
नगरः  शहरात मोठ्या प्रमाणात जैन समाज विस्तारलेला आहे. या समाजाकडून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात . अशाच अनोख्या पद्धतीने जैन बांधवांनी एकत्र येवून आणि एकमेकांच्या मदतीने समाजातील वंचित घटक, गरजु रुग्ण आणि इतर ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमानुसार सर्व मंदिरे बंद आहेत. परिणामी भगवान महावीर जयंतीचे मंदिरातील उपक्रम करता येणार नाहीत याची जाण ठेवत श्री . ॲड .संतोष भोसे, प्रकाश भाळवणकर आणि विजय औटी , संजय महाजन यांनी एकत्र येवुन काही रक्कम जमा केली त्यातून त्यांनी जीवनावश्यक वस्तु आणि धान्य घेतले यासाठी श्रीकांत देशमाने , भारतभुषण भागवत , प्रशांत सदावर्ते , महावीर अंबुरे , पार्श्वनाथ औटी , समीर रणदिवे यांनीही योगदान दिले .

प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत या सर्वांच्या उपस्थितीत सर्व वस्तुंचे वाटप अनाथाश्रम , कोवीड सेंटर निंबळक , पितळे जैन होस्टेल कोविड सेंटर , मातोश्री वृद्धाश्रम याठिकाणी गरजु रुग्णांना व वृद्धांना वाटप करण्यात आले.

जैन बांधवांच्या या उपक्रमाचे सर्व समाजातुन कौतुक होत - आहे .
close