shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोशल मेडियाच्या मदतीने मिळाला व्हेंटिलेटर बेड..!


देवळाली प्रवरा - दि. २२ एप्रिल 
देवळाली प्रवरा येथील एका २५ वार्षीय कोरोना बाधित रुग्णाची व त्याच्या आई वडिलांची व्हेंटिलेटर बेड साठीची अर्ध्या रात्रीची ससेहोलपट काल आप्पासाहेब ढुस यांनी  रात्री १:३५ वाजता सोशल मेडियाच्या माध्यमातून व्हायरल करून कुठे बेड उपलब्ध असल्यास संपर्क करणेची विनंती केली होती. 

त्यांच्या विनंतीस उदंड प्रतिसाद मिळाला, व काल  मध्यरात्री पासून मदतीचे कित्येक फोन ढुस यांना सुरू झाले.  आणि अखेर आज सकाळी १०.३० वाजता त्या पेशंटला औरंगाबाद च्या घाटी रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला असून रुग्णालयाने त्या पेशंटवर पुढील उपचार सुरू केले आहेत. 

देवळाली च्या त्या पेशंटला काल रात्री १:३५ पर्यंत राहुरी, अहमदनगर, विळद, संगमनेर, नाशिक कुठेही व्हेंटिलेटर बेड मिळाला नाही. ही बाब जेंव्हा आप्पासाहेब ढुस  यांनी सोसिएल मेडियाला टाकून त्या कोविड  पेशंटचा  स्कोर 23 असून  ऑक्सिजन लेवल 65 वर आल्याचे लिहून त्याचे आई वडील त्याला घेऊन बेड साठी कसे वन वन फिरत आहेत हे दाखविले तेंव्हा लगेच अर्ध्या रात्री त्या पेशंटच्या मदतीसाठी कित्येक हात सरसावले.  त्यामध्ये राहुरी चे तहसिलदार फसियोद्दीन शेख, केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे जिल्हा प्रमुख गिरीश जाधव, आमदार निलेश लंके, देवळाली चे माजी उप अध्यक्ष अनंत कदम, देवळाली प्रवरा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सतीश वाळुंज, दत्तात्रय वाणी, चारुदत्त पवार, टाकलिमिया येथील इम्रान शेख, सुकेवाडी संगमनेर येथील योगेश शिंदे, संगमनेर येथील आदित्य घाडगे, निमगाव खैरी येथील विलास पुंड आदी मंडळीसह कित्येकजण मदतीला धावलेने सर्वांच्या प्रयत्नाला सकाळी यश आले आणि सकाळी १०.३० वाजता त्या पेशंटला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात व्हेंटिलेटर बेड उपलब्ध झाला.  

अजूनही त्या पेशंटला बेड मिळालाका हे विचारणेसाठी ढुस यांना फोन येत असून सर्वांचे सहकार्याने त्या पेशंटला बेड मिळाले बद्दल आप्पासाहेब ढुस यांनी सर्वांचे आभार मानले व हे सर्व इतक्या लवकर केवळ सोसिएल मीडियाने शक्य झाले असल्याचे नमूद करून आता ते पेशंट सुखरूप घरी येणेसाठी आपण सर्वांनी त्या दयाधन विधात्याकडे प्रार्थना करावी अशी विनंती आप्पासाहेब ढुस यांनी केली आहे.🙏
close