shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना पिडीतांना स्वखर्चाने मोफत जेवण पुरविणारा असाही एक अवलिया...!


मोफत कोरोना सेंटर सुरु करण्याचाही घेतलाय ध्यास ...!

प्रतिनिधी : संजय वायकर
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे तालुक्याचे गाव. या गावातच असणाऱ्या तपश्री प्रतिष्ठान आणि गुरु गणेश दिव्यरत्न गौपालन संस्थेचे अध्यक्ष श्री श्रेनिकशेठ खाटेर यांनी त्यांच्या मित्र परिवाराला एकत्र करून त्यांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी मोफत जेवणाची सोय केली असून २२ एप्रिल पासून दोन वेळचे जेवण रुग्णांना उपलब्ध करून दिले आहे .या जेवणाचे डबे महावीर फर्निचर दत्तपेठ करमाळा या ठिकाणी मिळणार आहेत .
      

करमाळा शहरात वाढत्या कोरोनाचा उद्रेक आणि कोरोना पिडीत रुग्णांच्या अडचणी लक्षात घेवून श्रेनिक शेठ मोठ्या तत्परतेने धावून आले . समाजाप्रती असणारी आस्था त्यांना कधी स्वस्थ बसू देत नव्हती.


त्यांनी कोरोना बाधीत रुग्णांसाठी नागरिकांच्या मदतीने ऑक्सिजन ची सुविधा असणारे मोफत कोरोना सेंटर ही चालू करण्याचे ठरविले  आहे. त्यासाठीची सर्व रितसर परवानगी अंतीम टप्प्यात आहे. शहरातील डॉक्टरांचे सहकार्य ही त्यांना मिळत आहे .रुग्णांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य पूर्णपणे वाहून घेतले आहे .  त्यांचा मित्र परिवारही त्यांना समाज कार्यात मदत करतो.

गरजु रुग्णांना जेवण मोफत देण्यासाठी पुढील फोन नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे .
 संपर्कासाठी मोबाईल नंबर. 1)9423537458.
2)8484028555.. 3)9421030200.
4)9970017435.
या नंबर वर संपर्क करून डब्याची नोंदणी करावी. 

 नोंदणी टाइम्. सकाळी 9 ते 10.30.व
 सायंकाळी 3 ते 4.30.डब्बा मिळण्याची वेळ दुपारी 11.30 ते 1.30 
व सायंकाळी 5.30 ते 7.30  डब्बा मिळण्याचे ठिकाण....... 
महावीर फर्निचर,दत्त पेठ, करमाळा.
close