shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य सेवेतिल वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या रजा तात्काळ रद्द करा..डॉ वासुदेव नेहरकर..!!

केज । प्रकाश मुंडे जिल्हा प्रतिनिधी   :- 
बीड जिल्ह्यातील वढ़ता कोरोनाच प्रादुर्भाव पाहता रुग्ण संख्या दररोज वाढत आहे ,रुग्न तपासनिसाठी लगणारे डॉक्टर्स कमी पडत आहेत,आरोग्य कर्मचारी कमी पडत आहेत ,कामावर कार्यरत असणारे आरोग्य अधिकारी , कर्मचारी व कात्राटी कर्मचारी स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोना वार्ड मधे अहोरात्र रुग्ण सेवा देत आहेत.                                

परंतु त्यांचेच कही सहकारी कर्मचारी आशा परिस्थिति त पण वैद्यकीय राजेच्या नावाखाली सुटया घेऊन स्वतःचे खाजगी रुगनालाये चलावत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे कारण की देशात महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे ,कही ठिकाणी तर खाजगी डॉक्टरनी स्वतःहा ची रुगनालाये बंद करुण शासकीय रुगनालायात  मोफत सेवा दिल्या आहेत आशा आडाणीच्या वेळी शासकीय सेवेतिल वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी परवानगी नसताना स्वतः हा चे रुगनालाये चलवाने गुन्हा आहे.

याची चौकशी करुण जे कर्मचारी व अधिकारी वैद्यकीय राजेवर गेले आहेत जे खरेच आजारी आहेत कामावर येऊ शकत नाहीत त्यांना सुटया द्या पन जे अधिकारी व कर्मचारी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून रज़ा घेतल्या आहेत त्यांच्या प्रमानपत्रचे वेरीफिकेशन करा व जर ते बोगस असतील तर त्यांना तात्काळ हाजर होण्याच्या सूचना करा आणि हाजर होत नसतील तर त्यांना निलंबित करा व काम करण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांना संधी द्या अशी मागणी बीड जिल्हा वैद्यकीय अघडीचे जिल्हाअध्यक्ष  डॉ वासुदेव नेहरकर यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब बिड, उपसंचालक साहेब लातूर व जिल्हाशल्यचिकित्साक साहेब बीड यांच्याकडे केली आहे.
close