shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूरतही घडले माणूसकीचे दर्शन..! "हिंदु धर्मिय कोरोनाग्रस्त भगीनीच्या अंत्यविधीस मुस्लिम बांधवांचा सर्वतोपरी पुढाकार ..!"

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये एका हिंदु धर्मिय भगीनीचे आपल्या राहत्या घरातच कोरोनाने निधन झाले, मात्र शेजारी व परिसरातील तीचे कोणीही नातेवाईक वैगरे नाही.याचे जेव्हा माजी नगरसेवक नजीरभाई मुलानी यांना समजताच त्यांनी आपल्या समाजातील मित्र, तरुणांना सांगितल्याने परीसरातील मुस्लिम बांधव एकत्र आले आणि या हिंदू भगीनीस अंत्यविधीसाठी अमरधाम (स्मशानभूमी) मध्ये घेऊन गेल्याने श्रीरामपूरातही माणूसकीचे दर्शन घडल्याचे बघावयास मिळाले.

          मा.नगरसेवक नजीरभाई मुलानी

कोरोनाग्रस्तांच्या अंत्यविधीला जेथे रक्तातील नाते नकार देत असताना इतर समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन अंत्यविधी करावी यापेक्षा मोठं माणूसकीचं नातं ते काय ? अशी परीसरात चर्चा होत आहे.

"आज कोरोनाची दहशत सर्व दूर पसरली आहे ,  इतकी दहशत पसरली आहे की, रक्तातील नात्यातील नातेवाईक सुध्दा जवळ येण्यासाठी किंवा भेट द्यायला सुध्दा नाहक घाबरतात ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम बांधवांनी केलेल्या कार्याचे खरे तर नुसतेच कौतुक नसून समाजापुढे त्यांनी ठेवलेला एक आदर्श आहे. इतरांनीही अशा वेळी कोऱोनाला न घाबरता मदतीचा हात दिला पाहिजे. त्यांच्या कार्याचा आदर्श सर्व जाती धर्मातील नागरिक घेतील ही अपेक्षा करूया..!"
संपादक -शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह.!!"
close