सत्तेत नसतांनाही कोरोनाच्या रुग्णांच्या मदतीसाठी रमेशराव आडसकरांची माणुसकीची साद..!!
प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:-
देशात व राज्यात सध्या कोरोनाच्या महाभयंकर महामारीत शासन स्तरावरुन प्रयत्न होत आहेत.परंतु सत्तेत नसतानाही आपली सामाजिक बांधिलकी मानत अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.रमेशराव आडसकर यांनी धारुर मधील स्वतःच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात मंजुर झालेल्या शंभर बेड च्या कोव्हीड केअर सेंटरला अत्यावश्यक सर्व सुविधा रमेशराव आडसकर यांनी पुरविण्याचे जाहीर केले असुन त्याची अमंलबजावणीही आज पासुनच सुरु झाली आहे.राज्यावर आलेले हे संकट सर्वांचेच आहे याची व्यापक जाणिव ठेवुन आडसकरांनी उचललेले पाऊलात माजी आमदार कै.बाबुरावजी आडसकरांच्या संस्काराची एक छटा या परिसरात पहावयास मिळत आहे.
या ठिकाणी गंभीर रुग्णांसाठी अॉक्सिजनची सुविधा,रुग्णांच्या निवासा बरोबरच,नाश्ता,जेवन व अत्यावश्यक सुविधा रुग्णांना मिळणार आहेत.सध्याच्या या सुलतानी संकटाला तोंड देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात असे पाऊल उचलले तर काही दिवसात राज्या कोव्हीडमुक्त होण्याला वेळ लागणार नाही.
रमेशराव आडसकरांसारखी सामाजिक बांधिलकी सर्वच पक्षातील नेत्यांनी दाखविल्यास या कोरोनाच्या संकटाला थोपवण्यात मदत होईल हे निश्चित..!
राज्य वा देश आपल्या साठी काय करते या पेक्षा आपण देशासाठी काय करतो ही भावना जपण्याची ही वेळ आहे..!
केजच्या राजकारणात स्वतःकडे कोणतेही महत्त्वाचे पद नसतांनाही दिड दशकापासून आपला ठसा निर्माण करणारे रमेशराव आडसकर त्यांचे वडील माजी आमदार स्व.बाबुरावजी आडसकर यांनी केज च्या राजकारण ,सहकार ,शिक्षण इत्यादी क्षेञात 1965 ते 1990 पर्यंत केज अंबाजोगाईच्या राजकारणावर मजबुत पकड निर्माण केलेली होती.कै.बापुसाहेब काळदाते विरुद्ध आडसकर ही लढत संपुर्ण देशात गाजली होती...! त्यातुनच " हाबाडा " या शब्दाची निर्मिती झाली ती आज तागायत राजकारणात चर्चिली जाते.
ग्रामिण भागात आजही ग्रामपंचायत ,सेवा सहकारी सोसायटी ,केज कृषी उत्पन्न बाजार समिती ,अंबा सहकारी साखर कारखाना या सर्वांच्या माध्यमातुन ते खरे " मास लिडर " आहेत याची प्रचिती ते नेहमीच देत असतात.अंबा सहकारी कारखान्याच्या माध्यमातुन अनेक भुमीपुञांना न्याय मिळाला.
आसरडोह व चनई सर्कल मधुन जि.प.सदस्य म्हणुन निवडुन आल्या नंतर त्यांचा राजकीय आलेख वाढतच राहिला.योगेश्वरी सुतगिरणी ते अंबासाखर चे चेअरमन हा प्रवास शेतकऱ्यांच्या जिवनाशी निगडीत असल्यामुळे ते नेहमीच शेतकऱ्यांच्या विकासासाठी झटतात.पक्षीय मतभेद बाजुला ठेवुन राजकारण कसे करावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे रमेशराव आडसकर आहेत.जि.प.चे उपाध्यक्ष असतांना ग्रामिण भागाशी त्यांची नाळ जुळली.यशवंत ग्राम समृद्धी योजनेतुन हजारो कामे केली.पहिल्यांदाच आलेल्या सर्व शिक्षा अभियानातुन बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जि.प.शाळांच्या नव्या इमारती निर्माण केल्या.वित्त आयोगाच्या माध्यमातुन अनेक रस्त्यांचे कामे पुर्ण केली. सर्व सामान्य माणुस हा केंद्रबिंदु माणुन काम केले.
राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेञातही त्यांचा वावर आहे.पाणी फाँऊडेशनच्या कामात त्यांनी आनंदगांव ,कळमअंबा ,दिपेवडगांव या ठिकाणी प्रत्यक्ष श्रमदान करुन आर्थिक मदतीचा हात ही दिला हे विशेष होय. केज ,अंबाजोगाई ,माजलगांव या तालुक्यात विविध समाजाच्या लग्नात त्यांची उपस्थिती हे त्यांच्या सामाजिक व वैचारिक वृत्ती दिसुन येते.कोणतेही काम मनापासुन करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे.सध्याच्या कोव्हीड 19 कोरोनाच्या महाभंयकर महामारीत केज ,माजलगांव व अंबाजोगाईत प्रत्यक्ष जावुन गोर गरीब लोकांना अन्न धान्यांची मदत केली.माजलगांव मतदार संघातुन निसटत्या पराभव झाल्यानंतर ही दुसऱ्याच दिवशी अतिवृष्टीग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आडसकर धावले होते हे लोक कधीही विसरणार नाहीत.
शिक्षण क्षेञातही केज ,अंबाजोगाई धारुर व वडवणी तालुक्यात श्री.छञपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन शैक्षणिक वारसा जपण्याचे काम त्यांनी केले.प्राथमिक ते माध्यमिक शाळा सुरु करुन या भागात शैक्षणिक क्रांती केली.वसंत कनिष्ठ ,शिवाजी कनिष्ठ , व बाबुरावजी आडसकर वरिष्ठ महाविद्यालय केजच्या माध्यमातुन उच्च शिक्षण ही याच भागात मिळवुन दिले.
केजच्या शैक्षणिक क्षेञात शारदा इंग्लिश स्कुल , नर्सिंग स्कुल ,वसंत पाॉलिटेक्निक व आय टी.आय.व डी.फॉर्मसीचे शिक्षण संकुल निर्माण करुन ते आदर्श पद्धतीने चालविण्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चनाताई आडसकर या ही मदत करतात.केज शहराच्या वैभवात या शैक्षणिक इमारती भर पाडत तर आहेतच परंतु शैक्षणिक आलेख ही उंचावत आहेत. याच बरोबर धारुर मधील कस्तुरबागांधी ची प्रशस्त इमारत व केज मधील शारदा इंग्लीश स्कुलची प्रशस्त सुसज्ज इमारत या वास्तु कोव्हीड च्या काळातही रुग्णांच्या उपचारासाठी, समाजासाठी धावुन आल्या हे विशेष होय..!
माजी ग्राम विकास मंञी पंकजाताई ताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये काम करतांना शेतकरी ,शेतमजुर ,व्यावसायिक , युवक या सर्वांना आडसकर आपले वाटतात यातच त्यांचे खरे श्रेय आहे.
गरीबातला गरीब माणुस त्यांच्या बंगल्यावर जावुन प्रत्यक्ष भेटु शकतो.
सध्याच्या संसर्गाच्या वातारणातही सोशियल डिस्टंन्स पाळून ,सर्व नियमांचे पालन करुन दररोज घराच्या बाहेर पडणाऱ्या आडसकरांच्या या कामात त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना ताई आडसकर ,पुतणे रुषीकेश आडसकर व चिरंजिव रणजित भैया आडसकर मदत करत आहेत.
सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या भागातील पेशंट आपले आहेत.केवळ प्रशासनावर अवलंबुन न राहता कोरोनाग्रस्तांच्या मदतीला धावलेले रमेशराव आडसकर जनतेच्या मनात कायम घर करुन राहतील हे निश्चित आहे.
-शब्दांकन -प्रा.बी.जे.हिरवे,केज

