डाॅ. जितेंद्र घोसाळकर.
‘गुळवेल’ ही आयुर्वेदातील महत्त्वाची वनस्पती आहे.
गुळवेल या वनस्पतीस ‘अमृता’ हे नाव देखील आहे.
कारण, ती अमृतासमान गुणकारी आहे.गुळवेल माणसाच्या अगणित व्याधींना दूर करून त्यास दीर्घायुषी करते.
गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या
वा दुसर्या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी,
नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्या बारीक दोर्या सारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. गुळवेल ही दिसायला मनीप्लांट सारखीपरंतु, अतिशय दाट अशी विशाल वेल असते.
पाने हृदयाच्या आकाराची असतात.
यास पिवळी फुले येतात व लाल रंगाची छोटी छोटी गोल फळे झुबक्यां मध्ये लागतात.याचे कांड रसभरीत असते, ज्याचा औषधी करिता उपयोग केला जातो. गुळवेली ची अमृता समान, रसायनी वा वयस्था (तारुण्या चे रक्षण करून म्हातार पण व रोगाचा नाश करणारी)
अशी आयुर्वेदीय समर्पक नावे आधुनिक
संशोधनाने यथार्थ ठरली आहे.
गुळवेलीच्या मोठ्या वेली मांसल असून, मोठ्या
झाडांवर व कुंपणांवर पसरलेल्या असतात.
खोड - वेलीच्या खोडास लांब धाग्यां सारखी,
हिरवी मुळे फुटून ती खाली लोंबत असतात.
खोड बोटां एवढे जाड असून, त्यावरील साल
पातळ, त्वचे सारखी असते, नंतर तिचे पापुद्रे
निघतात. खोडांवर लहान- लहान छिंद्रे असतात.
खोड आडवे कापल्यास आतील भाग चक्राकार
दिसतो.पाने - साधी, एक आड एक, हृदयाकृती.
गडद हिरवी व गुळगुळीत असतात.
पानांचे देठ लांब. पानांवर 7 ते 9 शिरा दिसतात
व पानांची रुंदी 5 ते 10 सें.मी असते.
फुले - लहान पिवळ सर-हिरवी नियमित व एकलिंगी असतात. पानांच्या बेचक्या तून आलेल्या लांब, नाजूक, खाली लोंबणाऱ्या पुष्प मंजिरीत येतात. नर व मादी फुले वेग वेगळ्या वेलींवर येतात.पुष्प मंजिरीत नरफुले गुच्छात तर मादी फुले एकांडी येतात. पाकळ्या सहा, पुंकेसर सहा,बीजांड कोश तीन कप्पी, पराग धारिणी तीन विभागी.फळे - गोलाकार, मोठ्या वाटाण्या एवढी, कठीण कवची. पिकल्या वर लाल, गुच्छाने येतात.
बी एक, खडबडीत कवच असणारी.गुळवेलीला नोव्हेंबर ते जून या कालावधीत फुले, फळे येतात. गुळवेल प्रतिकार शक्ती तंत्रास सशक्त करते :शरीराचे प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास वारंवार सर्दी पडसे, ताप येणे, अशक्त पणा ही लक्षणे निर्माण होतात. गुळवेल च्या सेवनाने शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते. वारंवार आजारी पडणार्या व्यक्तींना गुळवेला मुळे फायदा होतो.
शरीरा तील प्रतिकार शक्ती तंत्र विकृत झाल्यास अनेक व्याधी निर्माण होतात. उदा. विभिन्न एलर्जी जन्य आजार .. तसेच . गुळवेल त्रिदोष शामक आहे. गुळवेल रोग प्रतिकार तंत्रास सामान्य करते. अशा व्याधींवर गुळवेल अतिशय उपयोगी आहे.
* गुळवेल हे संधीवात व अन्य वात व्याधींवर
उपयोगी आहे.
* गुळवेल शक्तिवर्धक व वाजीकर आहे.
* विभिन्न चर्मरोगां वर प्रभावी आहे.
* मूळव्याध, महिलांचे प्रमेहादी विकारावर उपयोगी.
* मानसिक व्याधींवर उपयोगी.
* गुळवेल रक्तातील कोलेस्टे रॉल व
रक्तशर्कराचे प्रमाण कमी करते..
गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे.
तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात.
गुळवेल कुटुपौष्टिक, पित्तसारक, संग्राहक,मूत्रजनन, ज्वरहर व नियत कालिक ज्वरनाशक गुणधर्माची आहे.
ही वनस्पती ताप, तहान, जळजळ, वांती यावर उपयुक्त आहे.ती रक्त सुधारक असून, पित्तवृद्धीच्या काविळीत
गुणकारी व त्वचारोगात उपयोगी आहे.
मधुमेह, वारंवार मूत्रवेग तसेच प्लिहा वृद्धीत उपयुक्त आहे.गुळवेल कुष्ठ व वातरक्त विकारा तही उपयुक्त आहे.
गुळवेलीचे सत्त्व व काढा वापरतात. गुळवेलीचा पाण्या तील अर्क ज्वर नाशक म्हणून वापरतात. गुळवेलीचा काढा शक्तिवर्धक असून, दुर्बल करणारे रोग, खंडित ताप आणि अपचनात वापरतात. गुळवेल सत्त्व दीर्घकालीन आम्ल अतिसारात वापरतात. आतड्यांचा प्रक्षोम आणि शक्ती क्षीण झालेली असताना तसेच संधिवाताची लक्षणे दूर करण्या साठी ही औषधी वनस्पती महत्त्वाची
मानली जाते.
सौम्य विषम ज्वरात आणि जीर्ण ज्वरात गुळवेलीचा चांगला उपयोग होतो.गुळवेलीने भूक लागते, अन्नपचन चांगले होते, रोग्याचा फिक्कट पणा कमी होतो, अशक्तपणा कमी होऊन शक्ती वाढते.कुपचन, पोटदुखी व काविळीत गुळवेल गुणकारीआहे.ही वनस्पती त्वचा रोगातही उपयुक्त आहे,
खाज व दाह कमी करते .
सेवन विधी :- गुळवेलचे खोड औषधी करिता
उपयोगात आणतात. करंगळी एवढ्या जाडीचे
एक फूट लांब कांड घेऊन त्यास कुटावे.
त्यात ५-१० तुळशीची पाने घालावी व २ कप
पाण्यात उकळावे.१/४ म्हणजेच १/२ कप होईपर्यंत आटवावे,नंतर गाळून १ चमचा मध घालून प्यावे.
दिवसातून एक किंवा दोन वेळा घ्यावे.बाजारा त गुळवेल सत्व, अमृतारिष्ट इत्यादी नावाने गुळवेल उपलब्ध आहे, परंतु ताजी गुळवेल वनस्पती अधिक प्रभावी आहे.
मोसमी फ्लू सारख्या तापां करिता ५- ७ दिवस व
अन्य व्याधीं साठी ३ आठवडे ते १/२ महिना.
गुळवेलीच्या भाजीचे औषधी गुणधर्म
गुळवेली च्या कोवळ्या पानां पासून भाजी करतात.
या भाजीने शरीरातील अग्नीचे वर्धन होते, त्यामुळे शरीरा तील पचनाचे कार्य अधिक चांगले होते. कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये ताप येऊन गेल्यानंतर गुळवेळीची भाजी खाणे फायद्याचे ठरते. कावीळ कमी होण्यास मदत होते.मधुमेहा मध्ये ही भाजी पथ्यकर आहे.
साखरे चा इष्टानिष्ट परिणाम शरीरा वर होतो,त्यामुळे थकवा येतो, अशा अवस्थेत ही भाजी वरचे वर खावी. वरचेवर येणारी सर्दी, खोकला,ताप यासाठी गुळवेळीची भाजी हितावह ठरते.त्वचेच्या विकारांचे मूळ कारण अनेक वेळा रक्तात असते. रक्तातील दोष नाहीसे करून, त्वचारोग कमी करण्या साठी ही भाजी उपयोगी आहे. कामाचा अधिक ताण पडून शारीरिक थकवा येतो.तो दूर करण्यासाठी गुळवेलीची भाजी उपयोगी पडते.
औषध उपयोगी अंगे-
खोड व पाने
> मात्रा - वाळलेले खोड व पानाचे पूर्ण 1-3 चमचे
दिवसातून 3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावे.
> काढा - 4-8 चमचे दिवसा तून 2- 3 वेळा घेऊन
वर पाणी प्यावे.
> गुळवेल सत्त्व - पाव ते अर्धा चमचा दिवसातून
3-4 वेळा घेऊन वर दूध साखर घ्यावी.
उपयोग
हृदय रोगात उपयोगी - गुळवेली मुळे रक्ता भिसरण सुधारून हृदय बळकट होते. वृद्ध लोकांनी व हृदय विकारा च्या रुग्णांनी गुळवेल सत्त्व किंवा अमृतारिष्ट घ्यावे.मुरलेल्या जुन्या तापा मध्ये- गुळवेल सत्त्व फार गुणकारी ठरते.यकृत विकार, कावीळ- गुळवेल सत्त्व अर्धा चमचाअधिक हळद अर्धा चमचा अधिक मध 1 चमचा दिवसातून 3-4 वेळा देणे.मधुमेहात उपयुक्त गुळवेली मुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते.
तसेच मधुमेहा मध्ये होणारे मज्जादाह (न्यूरायटिस), अंधत्व (आॅप्टिक न्यूरायटिस) इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते. शुक्रधातू वर्धक (व्रण्य)- स्त्री- पुरुषां च्या जनन संस्थेच्या विकारावर गुळवेल फार उपयोगीआहे.गुळवेलीचे चूर्ण घेऊन वर दूध साखर घ्यावे.रसायन कार्या साठी - प्रत्येकाने दररोज सकाळ व संध्याकाळ 1-1 चमचा घेऊन वर गाईचे दूध
पिल्यास आरोग्य चांगले राहून तारुण्याचे रक्षण
होते. मुंबईच्या जी.एस. मेडिकल कॉलेज मधील
प्रा. डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी केलेल्या संशोधनात गुळवेली मुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते व निरोगी राहते असे आढळून आले आहे.
पंडुरोग रक्तक्षय-
गुळवेल रक्त घटक वाढवते.गुळवेल सत्त्व वा अमृतारिष्ट घ्यावे.मानसिक ताणतणाव कमी होतो ..
- गुळवेलीमुळे मानसिक ताणतणाव कमी होतो.असे आता अधुनिक शास्त्रीय संशोधनाने सिद्ध झाले आहे. गुळवेलीचा परिणाम ॲड्रिनल या अंत:स्रावी ग्रंथीवर होऊन त्या ग्रंथीच्या ॲड्रिनॅलीन या अंत:स्रावा वर नियंत्रण येते.या अंत:स्रावा मुळे यकृता तून रक्त प्रवाहात
जी शर्करा मिसळली जाते. गुळवेली मुळे इन्शूलिन या अंत:स्रावा ची शर्करे वर चांगली प्रक्रिया होऊन परिणामी रक्ता मधील साखरेचे नियंत्रण राखले जाते. त्याचा मधुमेही ला चांगलाच उपयोग होतो.
गुळवेलीचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आत्यंतिक
महत्त्व थोडक्यात- यकृतोत्तेजक कार्य - यकृत हा आपल्या शरीरा तील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे.
सुमारे 500 महत्त्वाची कार्ये व 1000 विविध पाचक स्राव निर्माण करणारे शरीरा तील हे एकमेव इंद्रिय आहे. गुळवेलीमुळे यकृताचे कार्य चांगले होऊन आपले आरोग्य चांगले रहाते,कारण यकृता मुळे शरीराच्या सर्वच अवयवांचे कार्य सुधारते.
हृदय कार्य - गुळवेली मुळे हृदयाचे रक्ता भिसरण सुधारतेच, शिवाय मानसिक ताण कमी होत असल्याने सध्याच्या तणाव युगातील (stress-age) सततच्या मानसिक ताण तणावा मुळे हृदयावर होणारे दुष्परिणाम ही टळून हृदय बळकट बनते.
रसायन कार्य - आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती
वाढ विण्या च्या अत्यंत महत्त्वा च्या कार्यामुळे गुळवेलीचे महत्त्व अनन्य साधारण ठरते.म्हणूनच आपण प्रत्येकाने अगदी तुळशी प्रमाणेच गुळवेलही आपल्या परसात लावून दररोज गुलवेलीची ताजी 4-6 पाने चावून खावीत. ते शक्य नसल्यास गुळवेल सत्त्व खात्रीच्या
जुन्या आयुर्वेदिक कंपनीचेच वापरावेत, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. दररोजच्या गुळवेली च्या सेवनाने आपले तारुण्य रक्षण होऊन म्हातार पण दूर राहीलच, पण व्याधी चाही प्रतिकार होऊन शरीर निरोगी,
सतेज राहील .
ज्वरघ्न गुळवेल :-
गुळवेलचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म ती ज्वरनाशक, ज्वरध्न आहे. गुळवेल ही डेंग्यू, चिकन गुनिया, फ्लू, स्वाईन फ्लू इत्यादी विभिन्न व्हायरल इन्फेक्शन वर रामबाण औषध आहे.
डेंग्यू सारख्या व्हायरल तापामध्ये रुग्णांच्या रक्तातील श्वेत रक्तपेशी प्लॅटिलेट्स चे प्रमाण अतिशय कमी होते. त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. अशा रुग्णांना प्लाझ्मा रक्तघटक दिल्या जातो. परंतु अशा रुग्णांना गुळवेल दिल्यास त्यांच्या श्वेत रक्तपेशीव प्लॅटिलेट्स लवकर सामान्य होतात.

