shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन :-आमदार अण्णा बनसोडे


पिंपरी चिंचवड:-पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आमदार अण्णा बनसोडे यांनी केले आहे.


आरोग्य व्यवस्था जोरात कामाला लागली आहे. मात्र तरीही रुग्ण संख्या काही कमी होत नाही. परिणामी कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने निर्बंध कडक केले आहेत. शासनाच्या सूचना, मार्गदर्शन, दक्षता यांचे पालन करावे.

मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन, स्वच्छता या सर्व बाबींची काळजी घ्यावी. जेणेकरुन सर्वजण सर्वांच्या सहभागातून कोरोनाचा प्रसार रोखू शकू. शहरातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आमदार बनसोडे यांनी केले आहे.
close