प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:-
बीड जिल्हा रुगनालयाचा रोज एक एक नवीन निष्काळजीपणा समोर येत आहे . कोरोना रुगनांचा वाढता प्रादूर्भाव व त्यांना लागणारा ऑक्सीजन पुरवठा व ICU बेड,व वाढत्या रुगनांचा B plan करण्यात जिल्हा शाल्यचिकित्सक अपयशी ठरत आहेत.
पण याच बरोबर ईतर आजराच्या रुगनांकडे जिल्हा आरोग्य यंत्रनेचे दुर्लक्ष होत आहे .त्यामुळे सर्वसामान्य रुग्ण सुविधा मिळत नसल्याने त्रस्त आहेत, आसच एक प्रकार दी:14/04/21 रोजी जिल्हा रुग्णालयात घडला ,केज तालुक्यातील एकुरका येथील महिला प्रस्तुतिसाठी जिल्हा रुग्णालयात आली तिच्या सर्व तापसन्या करण्यात आल्या तिला थाबवन्यात आल तिचे एच् बी 7.5% होते तिच्या या पूर्वी दोन वेळा सिजेरियन शेक्शन झालेले होते त्यामुळे तिसऱ्या वेळी सुद्धा शस्त्रक्रिया करण्याची गरज लागत होती पन जिल्हा रुगनालायने ही महिला रुग्ण रात्रि 8:00 वा वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येते रेफर केली , रात्री आपरात्री महिलेला प्रस्तुतिसाठी 100 कीलोमिटर जावे लागले याच कारण कळणार का? कारण जिल्हा रुग्णालयात तर स्त्री रोग तदन्य आहेत भूल देणारे डॉक्टर आहेत सर्व सुविधा आहेत मग आसे रुग्ण का रेफर केले जातात याकडे जिल्हा शल्यचिकित्साक यांच लक्ष आसने गरजेचे आहे जर तिसऱ्या वेळेची शास्त्रकीया जिल्हा रुग्णालयात होत नसेल तर इतर रुगनालायाच विचार न केलेला बारा, त्यामुळे जिल्हा रुगनालायातील कामावर शंका उपस्थित होत आहेत,तसेच त्या महिलेची प्रस्तुती शास्त्रकीया वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई येते झाली आसुन बाळ व माता दोघेही सुखरूप आहेत.
डॉ अशोक थोरात जिल्हा शल्यचिकित्सक असताना वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई परिसरातील रुग्ण प्रस्तुतिसाठी व इतर शास्त्रकीया करण्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात येत आसत मग दोन महिन्यातच रुग्नणा इतर ठिकाणी उपचारसाठी का जावे लागत आहे , याच कारण पण शोधल पाहिजे. व सदरिल घड़लेल्या प्रकारची चौकशी होऊन स्त्री रुग्नणा प्रस्तुतिच्या व शास्त्रक्रियेच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघडीचे जिल्हाध्यक्ष डॉ वासुदेव नेहरकर यांनी उपसंचालक आरोग्य विभाग लातूर यांना केली आहे.

