shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज शहरात लसीकरण केंद्र सुरू करा - ..!!

(वरच्या दवाखान्यात जाण्यास अनेकांना अडचणी)  .....!! 
प्रकाश मुंडे । केज जिल्हा प्रतिनिधी:- 
सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत व याला प्रतिबंध घालण्यासाठी सरकारच्या वतीने लसीकरणाचा देखील वेग वाढवण्यात आला आहे परंतु केज येथे जिल्हा उपकेंद्रात लस देण्यात येत आहे मात्र शहरापासून हे रुग्णालय लांब असल्याने वयोवृध्द लोकांना याचा त्रास होत आहे तरी शहरात एक लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे व पशुपतीनाथ दांगट यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
 

कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी शासनाकडून मोठ्या उपाययोजना करण्यात येत आहेत व सध्या सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला असून जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी असे अवाहन करण्यात येत आहे मात्र केज मध्ये शासनाचे जे लसीकरण केंद्र आहे ते शहरापासून जवळपास २.५० की मी अंतरावर असलेल्या जिल्हा उपकेंद्रात आहे त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना तिथे जाणे सहज शक्य नाही त्यांना अनेक अडचणींचा सामना करून त्या ठिकाणी पोहचावे लागते त्यामुळे शहरात एक लसीकरण केंद्र सुरू करावे जेणे करून शहरातील सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांची सोय होईल अशी मागणी पत्र केज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे व पशुपतीनाथ दांगट यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच याबाबत जिल्हाधिकारी यांना देखील या संदर्भात पत्र पाठवण्यात येणार असल्याचेही ठोंबरे यांनी सांगितले.
close