आपण सर्व भारतीय अत्यंत भाग्यवान आहोत की, या पवित्र भारत भूमीवर आपला जन्म झाला आहे. मनुष्य प्राणी उत्पतीपासून आजपर्यंत स्वतः ची काळानुरूप बदल करत या पृथ्वीतलावर स्वतः:ची प्रगती करुन अधिराज्य गाजवत आहे. योगपुरूषांचे संस्कार , आचार-विचार , संस्कृती अंगीकार करून संपूर्ण नाती जपत, निसर्ग नियम पाळत संपूर्ण जगाला या भारतीयांंचे हेवा वाटावा असे वेगळेपणाचे, संस्कृतीचे रहस्य शोधण्यास या पृथ्वीतलावर संशोधनाचा विषय झाला आहे..!
सध्या कोरोना आजाराने थैमान घालून मनुष्यजीवन पुरते विस्कळीत केले आहे, परंतू प्रचंड इच्छाशक्ति, स्वयंशिस्त, सरकारी निर्देशाचे तंतोतंत पालन, सुरक्षित अंतर, सतत मास्क वापर, हात धुणे, गर्दीत जाणे टाळणे, सकारात्मक विचार करत आनंदित असणे आणि प्रतिबंधात्मक लस साठी प्रतिसाद देणे यासारखे उपाय करत नुकतेच इस्राएल देशातील संपूर्ण जनतेने विश्वात आदर्श निर्माण केले आहे. ज्या देशात लाँकडाऊन आहे त्या देशाची अधोगति होत कित्येक महिने, वर्ष तो देश मागे पडले नाही तर नवलच..!
विश्वसंकट आलेच कसे ? महारोग का आला ? मृत्युचे सावट का आले ? एवढे भय का निर्माण झाले ? असे एक ना अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. याचे उत्तर असे वाटते की, पृथ्वी वरील जमीन ठराविकच आहे , पण जागतिक मनुष्य लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकवस्ती वाढत असताना मोठ्या प्रमाणात जंगल तोड होऊन लोकसंख्या वेगाने वाढत आहे. लोकसंख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्याच्या दुपट्टीने-तिपटीने वृक्षारोपण होणे अपेक्षित असताना ग्लोबल वार्मिंगचे संकट डोके दुखी झाले आहे.
खरे तर पृथ्वी चा जन्म झाला त्यावेळेपासून आजपर्यंतचा विचार केला तर जमीन-अस्मानाचा फरक जाणवतोय...! पृथ्वीतलावर जमीन आहे तितकेच आहे, परंतू मनुष्य लोकसंख्या भयावह वाढत आहे. जंगलतोड होऊन काॅंक्रीटचे जंगले सर्रासपणे वाढत आहे, निसर्ग चक्रानुसार जे समतोल पाहिजे होते, ते राहिलेच नाही.निसर्गाच्या सान्निध्यातील अनेक पशू-पक्षी ,किटक, सरपटणारे जीव- जंतू पुर्णतः नाहीसे झाले आहेत. अनेक प्राणी आणि पक्षी,सरपटणारे प्राणी फक्त आता चित्रातच दिसतात. हे सर्व अतिशय भयावह व चिंताजनक आहे. या गोष्टी मुळेच निसर्ग चक्र बदलत आहे.
ज्यावेळी निसर्गाच्या सान्निध्यातील जीव- जंतू नामसेस होतात.. त्यावेळी पृथ्वीतलावरील इतरही गोष्टी नामसेस होतात, व अरिष्ट कोसळलते हा निसर्गचक्राचा नियम आहे. या गोष्टीकडे मनुष्याने लक्ष केंद्रीत करणेच नामसेस झाल्याचे दिसते.सध्याची विश्वाची परिस्थिती पहाता निसर्ग चक्र बिघडून सर्व आलबेल दिसत आहे. याचा फटका म्हणून कोरोना सारखा महारोग निर्माण होऊन जगातील सर्वांनाच बसत आहे,आणि अजूनही बसणार आहे. या नंतरही नवनवीन आजार पसरतील याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे.
लोकसंख्या वाढण्याचे अनेक कारणांपैकी एक प्रमुख कारण , मुलगा - मुलगी भेदभाव, दुसरे कारण "वंशाचा दिव्या" ची अपेक्षा, पण दिव्याकडून काय अपेक्षा तर, आई वडीलांचा म्हातारपणात व्यवस्थीत सांभाळ करावा...,शक्यतो या वंशाच्या दिव्याच्या अपेक्षेने लोकसंख्या अवाढव्य वाढून दारिद्रय वाढते...मालमत्तेचे विभाजन होते. खर्च वाढते आणि आर्थिक समस्या तीव्र निर्माण झाल्यानंतर सरकारी मदतीची गरज भासते. आणि सरकारी मदत इकडे वळविल्यामुळे देशातील विकास कामांना आडकाठी निर्माण होऊन देश अधोगतीला जाण्यास सुरुवात होते.
या गोष्टींवर वेळीच नियंत्रण ठेवायचे असेल , मनुष्यहानी वाचवायचे असेल तर..
जगातील प्रत्येक व्यक्तिने आपला सकारात्मक दृष्टिकोण ठेऊन "मुल एकच, झाडे पाच..!" असे सुत्र वापरत मुलगा- मुलगी एक समान समजावे.
भविष्यात प्रत्येक देशाने सदर सुत्र प्रत्यक्षात आणणार्या प्रत्येक पालकांचे अभिनंदन-कौतुक करुन त्यांना असलेल्या त्यांच्या वृध्दापकाळाची शासनातर्फे चिंता दूर करत त्यांंना चिंतामुक्त करण्यासाठी कायद्यात रुपांतरण करणे आजच्या काळाची खरी गरज आहे.
माहिती संकलन
श्री. राधेश्यामजी कुसमुडे
वांबोरी, ता. राहुरी, जि.अहमदनगर.
मो. 90961 18300

