shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रायगड जिल्ह्यातील "चोरढे" येथील 'तुषार भोपी' याने खडतर प्रवासामधुन आपले अभिनय क्षेत्रामध्ये केले स्वप्न साकार...!!

 पाटण तालुका प्रतिनिधी (महेश मस्कर):
स्वप्नाचे शहर मुंबई या मायानगरीत अनेकांना आकर्षण असते.या मायानगरीने अनेकांची स्वप्ने पुर्ण केली आहेत.आणि हजारो तरुण रोज येथे आपले कलाकार बनण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी येत असतात.

रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील "चोरढे" या छोट्याशा गावातील एका गरीब कुटुंबातील तुषार दिलीप भोपी याचा जन्म झाला.त्याने काम करत करत शिक्षण पुर्ण केले.त्याला लहानपणापासुनच अभिनयाची आवड होती,आपले करियर अभिनय क्षेत्रामध्ये करायच होत.मुंबईमध्ये आल्यानंतर त्याची आेळख महेश भाऊ मस्कर यांच्यासोबत झाली.महेश मस्कर यांनी तुषार याला मराठी मालिकेा "येऊ कशी तशी मी नांदायला" या मालिकेमध्ये काम करण्याची संधी प्रथमच दिली.

त्याचबरोबर पुजा नायर यानी तुषार याला प्रथम जिगरबाज या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी दिली. त्यानंतर तुषार भोपी याने "स्वराज्य जननी जिजामाता" 'बाळुमामाच्या नावान चांगभल' 'अग बाई सासुबाई' या नावाजलेल्या मालिकेमध्ये दमदार अभिनय सादर केला.तुषार याने मनाशी ठरवलेले स्वप्न साकार होताना दिसत आहे. त्याला पुढे देखील मालिका तसेच चित्रपटामध्ये काम मिळणार आहेत.ही गोष्ट तुषार साठी अभिमानास्पद आहे.









close