वडाळा महादेव:- या गावातील दक्षिण मुखी जागृत हनुमान मंदिरात हनुमान जयंती निमित्त पारंपरिक पद्धतीने हा जन्मोत्सव सोहळा सकाळी ६-१५ मिनिटांनी संपन्न झाला.
यावेळी कोरोना नियम पाळून गावाचे सरपंच दादासाहेब झिंज यांच्या हस्ते हनुमान मुर्तीस विधीवत अभिषेक पुजा करण्यात आली, नंतर आरती झाली. कार्यक्रम संपन्न झाले वर खोबरं, खिरापत,ओली हरबरा दाळ प्रसादाचे वाटप करण्यात आले.
हनुमान जन्मोत्सव सोहळा कोरोनाचे नियम पालन करून प्रमुख उपस्थिती मंदिर सेवेकरी गंगाराम दांगट, साळुंखे मंगेश साळुंखे मच्छिंद्र ,भोंडगे ज्ञानेश्वर, भोंडगे पुरोहित, शुभम कुलकर्णी पत्रकार दिलीप नवले, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र देसाई, किशोर महाले उपस्थित होते.

