shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अबब एवढया मोठया कोरोना महामारीत सोनई आरोग्य केंद्राने कोरोना टेस्टिंग थांबवली (ॲ्टिजेन तपासणी सुरू करण्याची जनतेतुन मागणी)


प्रतिनिधी । मोहन शेगर :-
सोनई--सध्या कोरोना महामारी मोठया प्रमाणावर वाढत आहेत.रोज तीन हजाराच्या पुढे जिल्हात कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत.नेवासा तालुक्यात सोनई हा कोरोना बाबतीत सध्या मोठा हाॅटस्पाॅट ठरला आहे.कारण रोज तीस ते पन्नास रूग्ण ॲन्टिजेन रॅपिड टेस्ट व आरटीपिसीआर मध्ये सोनई परिसरात सापडत असताना गेल्या पाच ते सहा दिवसा पासुन ॲन्टिजेन किट उपलब्ध नसल्याने सोनई प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोनाची अॅन्टिजेन तपासणी बंद केली आहे.यामुळे सर्वसामान्य लोकामध्ये प्रंचड असंतोष सोनईच्या आरोग्य यंञणे विषयी निर्माण झाला आहे.रेमडेसिवर व ऑक्सिजेन पुरवठा करण्यात सरकारला अपयश आले असताना आता अॅन्टिजेन रॅपिड टेस्ट किट पण देणे पण बंद केले काय सवाल या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.आता आंधळ दळतय आणि कुञ पिठ खाताय अशी अवस्था आरोग्य यंञणेविषयी झाली आहे.

सध्याच्या परिस्थिती मध्ये कोरोना साथ वाढत असुन नेवासा तालुक्यात अनेक रूग्णाचे मृत्यू बेड अभावी झाले.सोनई पेठेतील एक तरूण व्यापारी बेडच्या अभावी रस्त्यामध्ये मरण पावला. तसेच सोनईतील एका सामाजिक कार्यकर्त्याला बेड अभावी चार पाच दिवस घरीच उपचार करावे लागले होते.कसे बसे नेवासा येथे ऑक्सिजन बेड भेटले पण उशिर झाला असल्याने त्यांना मृत्यृचा सामना करावा लागला होता.अशा वाईट परिस्थिती मध्ये नेवासाची आरोग्य यंञणा झोपेचे सोंग घेतले असल्याचे दिसते.मागच्या कोरोना महामारीत नेवासा आरोग्यधिकारी  डाॅ.अभिराज सुर्यवंशी यांनी कोरोना नियंञणाचे अतिशय चांगले काम तालुक्यात केले होते. राञी अपराञी सोनईत येवुन ते कोरोना रूग्णांचे  नियोजन करत होता.पण यावेळे त्यांचे पण जास्त लक्ष सोनई परिसरात राहिले नसल्याने नियोजन  कोलमडल्याचे दिसते.तालुक्यात व सोनई परिसरात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना लवकर कोरोना अॅन्टिजेन टेस्टिग व सेंटर सुरू केले नाही.यामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे.तसेच बेड अभावी व तात्काळ उपचारा अभावी अनेक कुंटुबात कर्ते माणसे मृत्यृमुखी पडले.नेवासा आरोग्य यंञणेचे कुठलेही नियंञण सध्या राहिले नाही. सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात पायलीचे पन्नास डाॅक्टर भरती केले पण एक पण निवासी राहत नाही.राञी अपराञी गोर गरीब सोनई बारा वाडयातुन रूग्ण सोनई प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात पण आरोग्य अधिकारी जागेवर थांबत नाही.सरकार एवढे आरोग्य अधिकारी यांना पगार देते निवास देते पण आरोग्य अधिकारी याचा गैरफायदा घेत निवासी सेवा देत नाही.येथील आरोग्य अधिकारी यांची बदली न होता राजकिय वरदहस्ताने कित्येक वर्ष एकाच जागेवर आहेत.अशा कोरोनाच्या  वाईट काळामध्ये तरी आरोग्य यंञणेने सामान्य नागरिकांचे आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे.सोनई परिसरात कोरोनाने थैमान घातले असले तरी मस्तवाल आरोग्य यंञणा फक्त आपली हजेरी लावायचे काम करत आहेत.गोरगरीब लोकांकडे खाजगी कोरोना तपासणीसाठी हजारो रूपये नाही.यामुळे हे अॅन्टिजेन तपासणी लवकर सुरू करावी अशी मागणी सोनई परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
close