लॉकडाऊन मुळे सणाच्या दिवशी ही आमची चुल पेटली नाही...!
लाॅकडाऊन गरिबांना न परवडणारा..!
संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):
साकुर येथे असलेले ऊस तोड कामगार यांची सणाच्या दिवशी ही चूल पेटली नाही लॉकडाऊन मुळे त्यांना कामावर जाता येईना व त्यामुळे पैसे खिशात राहिले नाही.
व गुढीपाडव्याच्या सणानिमित्त तोंड गोड करणे तर सोडा आज घरात काही गोड-धोड तर तसेच खाण्यासाठी ही माग झालो आहे. अशी व्यथा साकुर येथील ऊसतोड कामगार आणि मांडली आहे. असेच राहिले तर आम्ही घरी कसे जाणार व घरी जाण्या पर्यंत आम्ही खायचे काय कारखान्याच्या मायबापांनी आमची थोडीशी तरी मदत करावी अशी व्यथा ऊस तोड कामगार यांनी मांडले आहे.

