नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :-
नगर तालुक्यातील सारोळा बद्दी येथे रॅपिड ॲटीजेन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आला होते.यावेळी नगर पंचायत समिती चे मा.सभापती प्रविण कोकाटे,नगर महानगरपालिका उपायुक्त संतोष लांडगे साहेब, सरपंच ,सचिन लांडगे, भाजपा जिल्हाध्यक्ष(सां.आघाडी) ,महेश वाघ,युवा नेते प्रकाश बोरूडे, आरोग्यसेविका सुशिला जाधव, आरोग्यसेवक डेव्हिड वाघमारे,आशासेविका नंदा बोरुडे,ग्रामसेवक एकशिंगे, हा कँप यशस्वी होण्यासाठी आदी परिश्रम घेतले. या तपासणीत अंतर्गत एकुण
९६ लाभार्थींची करोना टेस्ट करण्यात आली.या रॅपीड ॲटिजन स्टेट मध्ये ५ रुग्ण बांधीत आढळून आले.
संबधीत रुग्णांना चिचोडी पाटिल येथील कोंविड सेंटर येथे उपचार करता पाठवले आहे.तर जे कमी वयाचे आहे.त्यांना शासनाच्या विलगिकरण कक्षात पाठवले आहे.या कोरोना तपासणी कॅम्प मुळे कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य होते. आणि कोरोना साखळी तुटण्यास मदत होत आहे.आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी या साथिरोगात प्रामाणिकपणे सेवा बजावत आहे.असे ग्रामस्थानी आपल्या भावना शिर्डी एक्स्प्रेस शी बोलताना सांगितले.

