सध्याच्या कोरोना महामारीच्या भीषण परिस्थिती येवले तालुक्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजन बेडची गरज ओळखून येवले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक पुढे सरसावले आहेत.
शिक्षकांच्या भरीव आर्थिक योगदानातून व एकजुटीच्या निर्धारातून तातडीने 20 खाटांचा ऑक्सिजन सुविधेसह आणखी एक सुसज्ज कक्ष तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मा.गटविकास अधिकारी (उ.श्रे.) डॉ. उमेश देशमुखसो* यांच्या मार्गदर्शनातून तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद कातकाडे सो.यांच्या अणि येवला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांनी सुचवल्याप्रमाणे येवला येथील ग्रामीण रुग्णालयात स्वतंत्र आणखी 15 ऑक्सिजन बेडची सुविधा देण्यासाठी सर्व शिक्षक एकत्र येत भरीव आर्थिक निधी उभारला आहे, त्यातून 20 हॉस्पिटल कॉट,
20 जम्बो सिलेंडर,
20 आय. व्ही. स्टँड,
20 डस्टबिन,
रुग्णांसाठी इतर उपयुक्त साधने,साहित्य खरेदी करण्यात येत आहेत,
या बिकट परिस्थितीत येवला तालुक्यातील गरजू रुग्णांना याचा लाभ मिळू शकेल, या कामी सर्व शिक्षकांची समन्वय समितीचे सर्व सदस्य नाशिकला धोका पत्करून, फार धावपळ करून, कष्ट घेऊन प्रयत्न करत आहे. या रुग्णांच्या मदत/ सेवेमुळे शिक्षकांच्या लेकराबाळांना नक्कीच आशीर्वाद मिळतील, अणि आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या कृतज्ञ व संवेदनशील भावनेने अनेक दानशूर शिक्षक मदतीचा हात देत आहेत. तसेच या कामी राहिलेल्या प्रत्येक शिक्षकांनीही पुढे येण्याचे आवाहन शिक्षक समन्वय समितीकडून करण्यात येत आहे.🙏

