shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्युत वितरण महामंडळ नियंत्रण शासकिय समितीच्या सदस्यपदी स्वप्निल सावंत यांची नियुक्ती

विद्युत वितरण महामंडळ नियंत्रण शासकिय समितीच्या सदस्यपदी स्वप्निल सावंत यांची नियुक्ती 
इंदापूर प्रतिनिधी: उद्योग ऊर्जा व कामगार मंत्रालय मुंबई यांच्याकडील शासन निर्णयानुसार उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शासकीय विद्युत वितरण महामंडळ नियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हास्तरीय शासकीय विद्युत वितरण समितीच्या सदस्य पदी इंदापूर तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष स्वप्निल सावंत यांची निवड करण्यात आली.

या समितीचे कार्यक्षेत्र ४ लोकसभा व २१ विधानसभा असे असून पुणे विभागातून सहा सदस्य २१ विधानसभेचे आमदार पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज पाहणार आहेत. सावंत हे काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते असून आजपर्यंत पक्षाची विविध पदे भुषविली आहेत. सध्या इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्षपद त्यांच्याकडे असून अल्प काळात त्यांचा नावलौकीव वाढल्याने पक्षाने काँग्रेस कोट्यातून सावंत यांच्या नावाची या शासकिय समितीच्या सदस्य पदासाठी शिफारस केली होती.

या निवडीनंतर पुणे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात पुणे जिल्ह्यातील महावितरणशी निगडीत असणाऱ्या कामांना प्राधान्य देणार असून काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी वर्गाच्या अडचणींना प्राधान्य देऊ. इंदापूर तालुक्यासह सर्वच भागातील शेतकरी वर्गाचे विजेच्या बाबतीत असणारे गंभीर प्रश्न केंद्रबिंदू मानून मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल असे मत विद्युत वितरण महामंडळ नियंत्रण शासकीय समितीचे सदस्य स्वप्निल सावंत केले आहे.
close