shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खर्डा शहरात आज पासून कडकडीत बंद..!!

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला आळा बसण्यासाठी जनता कर्फ्यु..!!

कोरोना रोखण्यासाठी प्रशासन अलर्ट, नियम मोडल्यास होणार कारवाई..!!

खर्डा प्रतिनिधी  ( अनिल धोत्रे)
जामखेड तालुक्यातील गावागावात ,खेड्यात वस्ती पर्यन्त कोरोना आजाराने  थैमान घातले आहे .रोज संक्रमित रुग्णाची संख्या वाढत आहे हे साखळी खंडित करण्यासाठी खर्डा शहरातील व्यापारी ,ग्रामपंचायत, महसूल विभाग यांची तातडीची संयुक्त बैठक होऊन बुधवार दिनांक ५पासून ते शनिवार १५ पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद ठेवण्याचे ठरवण्यात आले.
     
खर्डा शहर आणि परिसरात वाढत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी या हेतूने नागरिक व व्यापारी वर्गाने स्वयंस्फूर्तीने स्वीकारलेला जनता कर्फ्यु मध्ये सर्वांनी नियमाचे पालन करण्यात यावे असे सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी सांगितले.
   
या जनता कर्फ्यु काळात अत्यावश्यक सेवा दवाखाना ,औषधे दुकाने वगळता  इतर सर्व आस्थापने पूर्णपणे बंद राहतील.या काळामध्ये कोणीही बाहेर फिरु नये,यापूर्वी अशा निर्णयाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने कोरोना हद्दपार झाले होते संचारबंदी दरम्यान सर्व नागरिकांनी  सहकार्य करावे असे कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले. 
  
यावेळी पोलीस प्रशासनाकडून घालून दिलेले नियमाचे काटेकोरपणे पालन करावे जे कोणी नियम मोडतील,गाडीवर डबल शीट प्रवास करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे  सांगण्यात आले. 

यावेळी भाजीपाला विक्री साठी सकाळी सात ते अकरा पर्यंत फिरून विकण्यासाठी परवानगी देण्यात आले तसेच अत्यावश्यक दुकाने व्यतिरिक्त इतर दुकाने चालू दिसल्यास एक हजार रुपये आणि दुसऱ्या वेळेसकारवाई मध्ये सापल्यास पाच हजार रुपये दंड व लॉकडाऊन  असे पर्यंत दुकान सील करण्यात येणार आहे . 

विनाकारण शहरात फिरणे आणि चौकात बसणे यावरही निर्बंध लावण्यात आले आहे असे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सांगितले.
 

यावेळी खर्डा येथील लहान -मोठे व्यावसायिक  सरपंच आसाराम गोपाळघरे,उपसरपंच श्रीकांत लोखंडे व्यापारी वर्ग ,कामगार तलाठी श्रीराम कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते,पोलीस नाईक संभाजी शेंडे,पोलीस हेड कॉन्टेबल शशीकांत म्हस्के ग्रा प सदस्य वैभव जमकावळे,मदन गोलेकर, महालिंग कोरे,महेश दिंडोरे,प्रकाश गोलेकर,चंद्रकांत गोलेकर,शिवाजी भोसले सह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
close