shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपळेगुरव येथिल सामाजिक कार्यकर्त्या तसेच राष्ट्रवादी कॅांग्रेस(महिला),प्रभाग अध्यक्ष कु.संजीवनी पुराणिक यांनी २०२० ते आजच्या तारखेपर्यंत लॅाकडाऊनमध्ये केलेले प्रशंसनिय कार्य..याविषयी लेख..!!

अहमदनगर जिल्ह्यातिल पुणतांबा हे जन्मगांव असलेली व कोपरगांव येथिल S.S.G.M. Collegeयेथे शिक्षण झालेली तरूणी पिंपरी-चिंचवडकरांसाठी ठरतेय संजीवनी.



पिंपळेगुरव येथिल सामाजिक कार्यकर्ता तसेच अलिकडेच राजकारणात प्रवेश करून..राष्ट्रवादी कॅांग्रेस(महिला),प्रभागअध्यक्ष बनलेल्या,कु.संजीवनी पुराणिक यांनी २०२० च्या लॅाकडाऊनपासून ते आजच्या तारखेपर्यंत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत तसेच आजपर्यंत त्यांनी “७६” कोरोणा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत केली आहे.



त्यात रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे टेस्टींग,होम क्वारंटाईनच्या प्रोसिजर मध्ये मदत.रूग्नांच्या नातेवाईकांना घरपोच जीवनावश्यक वस्तु घरपोच पोचविणे.रूग्नांची कांही वेगळे खाण्याची ईच्छा झाल्यास त्यांना दवाखान्यात त्यांची आवडती वस्तु पोचविणे.बिल्डिंगचे व परिसराचे वेळेत सॅनिटायझेशन करून घेणे. 

रूग्णांना ॲाक्सिजन बेड,व्हेंटिलेटर बेड, प्लाझमा उपलब्धता याबाबतित माहिती पुरविणे,दुसर्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पासबाबतित नागरीकांना सहकार्य करणे,कोरोणा लसिकरणात सिनियर सिटिझन्सला मदत करणे अशी असंख्य कामे संजीवनी पुराणिक यांनी केली आहेत.

कोरोणा काळात नागरिकांसाठी खर्या अर्थाने नांवा प्रमाणेच “संजीवनी” ठरलेल्या संजीवनी पुराणिक…. संजीवनी पुराणिक यांचे कार्य पाहता त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा म्हणावा लागेल.

close