नवी दिल्ली । मध्यप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. एका तरुणाने आपल्याच प्रेयसीचा गळा चिरुन तिचा खून केला.
तिचा खून केल्यानंतर नवरदेव म्हणून हळदीसाठी बसलेल्या आरोपीला पोलिसांनी हळदीच्यावेळी अटक केली.
आरोपी तरुणाची चौकशी केल्यानंतर गर्लफ्रेंन्डच्या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आलं आहे.
संबंधित घटना ही मध्यप्रदेश येथील शिवपुरी जिल्ह्यातील आहे. आरोपीचं नाव संजय कोरी असं आहे तर मृत झालेल्या त्याच्या प्रेयसीचं नाव लक्ष्मी तोमर
असं आहे.
संजय याला पोलिसांनी त्याच्या हळदीच्या दिवशी चालू हळदीत अटक केली. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. यादरम्यान आपली प्रेयसी लक्ष्मीचा घटस्फोट झाला असून ती आपल्यावर लग्न करण्यास
दबाव टाकत असल्याचं त्यानं सागितलं आहे.
आरोपीने दिलेल्या माहितीनुसार त्याची प्रेयसी जरी त्याच्यावर लग्नाचा दबाव टाकत असली तरी संजयला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. म्हणून संजयने तिला आपण लग्न करु असं सांगून गुना येथे बोलवलं. लक्ष्मी तिथे पोचताच संजयने तिचा गळा चिरुन तिला झाडांमध्ये फेकून दिलं. संबंधित घटना ही ३० एप्रिलला झाली असून संजयचं लग्न ८ मे ला होणार होत.

