shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंडोनेशियातील गव्हर्नरने सन्मानित केले आहे शेखर भाकरे यांना...! कोरोना विरोधी मोहिमे साठी सादर करतात बुरगुंडा भारुड.:-संजय देशमाने

प्रतिनिधी : आसावरी वायकर
औरंगाबाद (दि.१५) : कोरोना सारख्या आजाराचा गांभीर्याने विचार करून कोरोना च्या संदर्भात कोणती काळजी घेतली पाहिजे याचा प्रचार प्रसार करण्यासाठी मागील दहा महिन्यांपासून  भारूडरत्न श्री निरंजनजी भाकरे खेडेपाडे फिरून भारूडाच्या माध्यमातून कार्य करीत होते. पण "कालाय तस्मै नमः". आता हे कार्य करीत आहेत त्यांचे चिरंजीव श्री . शेखरजी भाकरे आणि त्यांचे सहकारी .त्यांनी कोरोना वरील बुरगुंडा भारुड अत्यंत मार्मिकपणे सादर केले आहे .
असे औरंगाबाद येथील श्री . संजय देशमाने यांनी सांगितले .



शेखर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करा , सॅनिटायझर वापरा , हात साबनाने स्वच्छ धुवा अशा विविध उपाययोजना  तसेच लसीकरण करून घेणे किती गरजेचे आहे हे त्यांच्या बुरगुंडा भारुडातून सांगितले आहे .

शेखर भाकरे यांनी २०१८ साली इंडोनेशिया येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर केला . त्याबद्दल त्यांना तेथील गव्हर्नर मांग कु पास्तीका यांचे हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे .

प्रशासनाने शेखर भाकरे यांच्या कार्याची कोरोना विरोधी प्रचार व प्रसार याची दखल घेवून त्यांना सन्मानीत व पुरस्कृत करावे अशी नागरिकांमधून मागणी आहे .

मुळातच जैन किर्तनाचा आणि गायनाचा वारसा असणारे श्री .संजयजी देशमाने यांनी शेखर भाकरे यांची माहिती संकलित करून ती समाजात जागृती घडवून आणण्यासाठी जगासमोर आणली आहे .
close