अनाथ गरजु मूलांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही स्विकारू ... डॉ. पारस कोठारी
प्रतिनिधी । संजय वायकर :-
नगर (दि.१८) : कोवीड १९ विषाणुचा प्रादुर्भाव पूर्ण जगात पसरलाय . महाराष्ट्र राज्यातही या विषाणूने थैमान घातलेय . कित्येक लोक कोरोना बाधित होवून दगावले आहेत .
डाॅ.पारस कोठारी
अशातच कित्येक घरातील आईवडिल कोरोनाने मृत्युमुखी पडलेत . त्यांची मुले अनाथ झाली आहेत . मुलांचे भविष्य अंधकाराच्या गर्तेत हरवून गेले आहे. अशा मुलांना काही सामाजिक संस्थांनी रहाण्याची खाण्याची व्यवस्था केलीय . त्यांना मायेचा ममतेचा हात देणाऱ्या संस्थांमध्ये नगरमधील एक संस्था आहे ज्यांनी या अनाथ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारलीय .
हिंद सेवा मंडळाचे ज्युनिअर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूल , अ.नगर. या संस्थेचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी अनाथ गरजु विद्यार्थ्यांसाठी समाजाला आवाहन केले आहे की कुठल्याही गावात कोरोना काळात आई वडिलांच्या मृत्यूने अनाथ झालेली मूले असतील तर त्यांची माहिती आमच्याकडे पाठवा . त्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ .
डॉ. कोठारी यांचा अनेक सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आहे . या हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री . सुनिल सुसरे सर यांनी अथक प्रयत्नाने अनेक विद्यार्थी घडविले आहेत.
अशाच विविध सामाजिक कार्यात संस्थेमध्ये कार्यरत असलेले शिक्षक श्री . देवीदास खामकर, श्री गजेंद्र गाडगीळ , श्री .शरद पवार ,श्री .महादेव राऊत , श्री .अमोल कदम ,सौ. दुराफे मॅडम आणि सौ.साठे मॅडम हे मोठ्या उत्साहाने भाग घेतात असे श्री .सुसरे सर यांनी सांगितले .
संपर्कासाठी मो. नंबर
डॉ. पारस कोठारी ( चेअरमन )
९८ २२ ०२ ४८ ७३
श्री . सुनिल सुसरे
( मुख्याध्यापक )
९८ २२ ५२ २२ २३

