प्रतिनीधी पुणे, स्नेहा उत्तम मडावी
कोरोनापेक्षा घातक कोण आहे ? असा प्रश्न पडतो..ती आहे " भुक", आज गरीब भुकेपायी उपाशी पोटी झोपत आहे परंतू आपल्या मतदार संघातील गरीब रोजंदारी पासुन वंचित झाला तो आज शासकीय सोयीसुविधांपासून वंचित राहिला,शेवराई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हजारो गरीबांना मदत केली गेली,
परंतू मतदान झाल्यापासून लोक प्रतिनीधी मात्र या गरीबांच्या झोपडीकडे साधे फिरकले देखील नाहीत. हि दुःखत बाब आहे,मतदान झाले कि लोक प्रतिनीधी येतात ते फक्त रस्ते आणि इमारतीच्या ओपनिंगसाठी गावात आले की, गावातील चार गावपुढारीची भेट घेऊन जातात ते कधी आले कधी गेले हे दुस-या दिवशी समजते. मग राज्यातील गरीबांचे प्रश्न, त्यांचे दु:ख, त्या गरीब कुटुंबातील लोकांनी कोणापुढे मांडावे हा एक प्रश्न आहे ,
ऑनलाइन शिक्षण चालू आहे परंतू ते कोणाचे ? हा पण एक प्रश्नयेथे गरीबांची राहाण्याची व खाण्याची पंचायत तर तो ऑनलाईन शिक्षण कधी घेणार !
आज राज्यातील देशातील हजारो गरीबांची मुले शिक्षणापासून वंचित आहेत, या विषयावर कोणी चर्चाच करीत नाही.
देश कोरोणा संगे झगडतोय, परंतू त्यात हे कसे काय ?
900 चे इंजेक्शन 15000 ला विकनारा मनुष्य आहे.
उपचार काहीच नाही पण लाखोंचे बील देणारा मनुष्य आहे.
500 रूपये कमाई असणाऱ्या व्यक्तीकडून 1000 रूपये दंड वसूलणारा मनुष्य आहे.
200ची टेस्ट 1100 घेणाराही मनुष्य आहे.
हे सर्व बघता कोरोना पेक्षा मनुष्याचीच भिती जास्त वाटते.
आज या कोरोणाच्या विळाख्यात सर्वात जास्त गरीब होरपळतोय. कोविड सेंटर हे कोणासाठी आहे हे आजपर्यंत समजले नाही, सरकारी दवाखान्यात गरीबांना जागा मिळत नाहीत,
खरे तर आपण हे विसरून गेलो आहोत की साने गुरुजी यांची ही कविता व आपल्या लहापणाची ती प्रार्थना," खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम आर्पावे "..
हे शब्द फक्त ऐकण्या पुरतेच राहीले,
आपल्या लहापणी पहाटे सकाळी विहीरीवर मोट हाकणारा शेतकरी गाणे गायी, "चलरे राज्या चलरे सरज्या गाऊ मोटवरच गान , या खळखळत्या पाण्याने फिजवूया हे सारे माळरान कष्टाण फुलवूया आपले माळरान", त्यावेळी शेतकरी देखिल जनावरांशी एक जीवाने राहत होता. आज ते दिसत नाही...
मानवता धर्म पाळाला पाहिजे जेवढे शक्य आहे तेवढी मदत आपल्या शेजारील गरीबांना केली पाहिजे.
आजचा काळ भयंकर आहे. देशातील राज्यातील हातावर पोट भरणा-याची संख्या जास्त आहे,कोरोणामुळे रोजंदारी गेली त्यामुळे हातावर पोट भरणा-या गरीबांवर पाणी पिऊन झोपण्याची वेळ आली, तसे म्हणले तर कोरोणा भारतात आणला कोणी हा एक प्रश्न आहे,आणि त्याचे परीणाम भोगतोय कोण?
अगदी परवाची एक भयंकर घटना आहे,सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील एका स्मशानात एक मनोरुग्ण स्मशानातील प्रेताचे माऊस खात होता तो पाहुन आगांवर आकक्षेरशा अंगावर शहारे उभारले ...
आज राज्यातील गरीब उपाशी पोटी झोपतात मृत्यूशी झुंज देतात ,परंतू शासनाला व आदिवासी मंत्रालय यांना आजपर्यंत हे दिसत नाही हे चिंताजनक आहे, आज राज्यातील पुणे,सातारा, सांगली,कोल्हापूर या चार जिल्हातील आदिवासी समाजाची आदिवासी घोडेगाव प्रकल्पाकडून गेली अनेक वर्ष फसवणूक होत आहे.शासनाकडून दिल्या जाणा-या सोयी सुविधा ह्या फक्त कागदावरच आहे. आजपर्यंत आदिवासी हा उघड्यावर डोंगर दऱ्यांत कसल्याही सवलतीविना भटकंती करत आहेत. अशात जर कोणाचा मृत्यू झाला तर, दफन करण्याकरता देखिल जागा नाही,हे आजपर्यंत लोक प्रतिनिधींना का दिसत नाही? असा प्रश्न पडतो , त्या मध्ये आत्ता कोरोणाची भर जगावे तरी कसं असा प्रश्न राज्यातील गरीब कुटुंबाना पडत आहे.
या कडे शासनाने गांभीर्याने लक्ष्य देणे गरजेचे आहे.
आपण लेखक समीर सामंत याचे गित.सर्वांना मार्गदर्शन करते की
हिच आमंची प्रथना अन हेच आमंचे मागने,
मानसाने मानसाशी मानसा सम वागणे...
आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले.
(महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त ,
व अध्यक्ष शेवराई सेवाभावी संस्था.)
फोन 08888698870




