shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

औंढा नागनाथ येथे पोलिसावर जमावाचा हल्ला,पोलिस निरीक्षकाचा हवेत गोळीबार..!!

हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.१६,हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पोलिस ठाण्यावर जमावाने दगडफेक केल्यानंतर जमवाला पांगविण्यासाठी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना आज दि.१६ मे शनिवार रोजी घडली असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

औंढा पोलिस स्टेशनवर जमावाने तुफान दगडफेक केल्याची घटना घडली आहे शंभर ते दीडशे नागरिकांनी हा हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली दरम्यान पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असतांना जमावाने मुंडे यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे यांच्या वर प्राणघातक हल्ला केला या हल्यात वाघमारे हे जखमी झाल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी हवेत गोळीबार केला या नंतर हिंगोली पोलिसांची मोठी कुमक औंढा शहरात दाखल झाली असून पोलिस अधीक्षक राकेश कलासागर हे देखील परीस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी औंढा पोलिस  स्थानकात तळ ठोकून आहेत दरम्यान या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरान विरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
close