shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरेगाव येथील राजस्थानी महालक्ष्मी ट्रेंडर्स च्या मालकांची गळफास घेऊन आत्महत्या...!


कोपरगाव प्रतिनिधी (विशाल लोंढे):- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील महालक्ष्मी ट्रेंड्स च्या मालकांची सोमवारी सायंकाळी पत्र्याच्या शेड मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सावळीविहिर- भरवस राज्य मार्ग सात लगत सुरेगाव येथे माहेगाव पेट्रोल पंपा शेजारी सुमारे दहा वर्षापासून महालक्ष्मी बिल्डिंग मटेरीयल चे दुकान राजस्थान येथून आलेले शंकर चौधरी यांनी टाकलेले होते. सोमवारी सायंकाळी सहा वाजता शंकर यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत नागरिकांना आढळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. मित भाषि असणारे शंकर यांचा स्वभाव ग्राहकांना आकर्षित करणारा असल्याने धंद्यात त्यांनी चांगला जम बसवला होता.

लॉक डाऊन काळात दुकानात असणारे सर्व कामगार राज्यस्थान येथे गावी गेले असता ही घटना घडली. मृत देह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
close