shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन संस्था व सुप्रिया निलेश चावर, कोविड रुग्णासाठी मदतीचा हात पुढे..!!

पुणे:-कात्रज, पुणे येथे राहणाऱ्या सौ. सुप्रिया निलेश चावर या भगिनी स्वतःचे मेडिकल शॉप आणि घर संभाळून या कोरोनाच्या  कठीण काळात शक्य तेवढे कोरोना रुग्णांची मदत करत आहेत. कोरोना रुग्णांसाठी लागणारे बेड्स, ऑक्सिजन, प्लाजमा व रुग्णांसाठी लागणारे औषधे त्या तत्परतेने उपलब्ध करून देत आहेत. 


त्यांचे हे काम(World Maratha Organization ) वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन WMO या संस्थेअंतर्गत चालू आहे. त्या स्वतः या संघटनेच्या सदस्य आहेत. तसेच त्या रक्तदानासाठी जनजागृती करून अनेकांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करत आहे. या कामात त्यांना त्यांच्या पतीचीही साथ लाभत आहे.
close