शिर्डी । प्रतिनिधी ( तुषार महाजन ) :
राहाता नगरपरिषदेने दिव्यांग बांधवांचा हक्काचा पाच टक्के निधी लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर वर्ग करावा यासाठी राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरप्रमुख अविनाश सनांसे यांनी राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री चंद्रकांत चव्हाण यांना निवेदन दिले असून निवेदनात या वर्षीचा दिव्यांग पाच टक्के निधी तातडीने वितरित करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोना महामारीत दिव्यांग बांधवांची प्रचंड आर्थिक हेळसांड होत आहे. यास अनुसरून दिव्यांग बांधवानी नगरपरिषद राहाता येथे अपंग निधी मिळवण्यासाठी वारंवार मागणी केलेली आहे मात्र अद्याप हा निधी मिळलेला नाही. तरी अपंगांच्या हक्काचा पाच टक्के निधी तातडीने वाटप करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना करावे अशी मागणी या निवेदनाद्वारे केली गेली आहे. अन्यथा पुढील सहा जून या तारखेला सर्व अपंग बंधूंना घेऊन नगरपरिषदे समोर आंदोलन करण्यात येईल असेही या निवेदनात म्हणाले आहे.
यावेळी राहाता शहरप्रमुख अविनाश सनांसे, गणेश भुजबळ, राहुल दुसाने, हर्षल जाधव आदी पदाधिकारी यांच्या सह्या होत्या. तसेच जिल्हा संघटक अभिजीत कालेकर, शरदराव वारुळे, जिल्हा सरचिटणीस अभिजित पाचोरे, जिल्हा कार्यादयक्ष संजय शिंदे, राहाता तालुका अध्यक्ष दिनेशराजे शेळके, उपाध्यक्ष विजय काकडे, दिपकराव घोगरे, संघटक वसंतराव काळे, अमोल कडू , कार्याध्यक्ष सोमनाथ लहामंगे, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष रोमचंद कडू , मंगेश नळे, समन्वयक जगन्नाथ सरोदे, सचिव सुधाकर डांगे, सचिन आरने, दिव्यांग क्रांती तालुकादयक्ष भाऊनाथ गमे, उपाध्यक्ष नितीनकुमार भन्साळी, सुरेश गुगळे, नवनाथ पुंड, विशाल दाभाडे, रामदास तनपुरे, उपसरपंच अनिल आहेर आदी राहाता तालुका प्रहार पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले आहे.

