नगर । प्रतिनिधी :
प्रहार संघटना आणि तहसील कार्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज नगरमध्ये "जाऊ द्या ना राव " तुफान विनोदी टीमचा कोविड दौऱ्याचा ४ था शो उत्स्फूर्त रित्या पार पडला ... !!
नामदार आदरणीय श्री. बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेतून उभारलेले कोविड सेंटरला भेट देऊन तेथील कोरोनाबाधित दु:खी रुग्णांचे मनोरंजन करून त्यांना निखळ हास्याचा डोस दिला गेला . थोड्यावेळासाठी का होईना जाऊ द्या ना रावच्या ह्या कोविड दौऱ्यामुळे रुग्णांना जबरदस्त मनोरंजनाची मेजवानी मिळतिये .. आणि "जाऊ द्या ना राव " च्या टीमला मिळतायेत भरभरून प्रेम आणि आशिर्वाद....!!
या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री. विनोदजी परदेशी यांनी टीमचे आभार मानून खुप सा्र्या शुभेच्छा दिल्या ... !
तसेच प्रहार अकॅडमी चे मान्यवरांनी सुद्धा आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या ...!

