तिघा विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल.
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील कोरेगाव येथे सामाईक पाईप लाईन फोडल्याच्या वादातून तिघांनी झोपेत असलेल्या एकावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याच्या प्रयत्न करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे.
या बाबतची माहिती अशी की, कोरेगाव ता. केज येथे धनराज युवराज तांदळे व अविनाश विठ्ठल तांदळे हे दोघे सख्खे चूलतभाऊ भाऊ असून यांची शेजारी जमीन आहे. त्या दोघात सामाईक पाईप लाईन केलेली आहे.
धनराज युवराज तांदळे याने ती पाईप लाईन फोडली. त्याचा राग मनात धरून दिनांक २० मे बुधवार रोजी धनराज तांदळे, त्याचा भाऊ राम तांदळे व आतेभाऊ जगन्नाथ तोंडे हे घरा समोर झोपलेले असताना रात्री १२:१५ वा. च्या दरम्यान अशोक विठ्ठल नेहरकर (रा. पिसेगाव ता. केज), अविनाश बाबासाहेब तांदळे (रा. कोरेगाव ता. केज) आणि बप्पा शामराव तोंडे (रा. सोनिमोहा ता. धारूर) या तिघांनी संगणमत करून पाईप लाईन का फोडली ? या कारणा वरून अशोक विठ्ठल नेहरकर याने धनराज युवराज तांदळे याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. यात धनराज याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला व डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
सदर प्रकरणी धनराज युवराज तांदळे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात अशोक विठ्ठल नेहरकर (रा. पिसेगाव ता. केज), अविनाश बाबासाहेब तांदळे (रा. कोरेगाव ता. केज) आणि बप्पा शामराव तोंडे (रा. सोनिमोहा ता. धारूर) या तिघांच्या विरुद्ध या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

